पुणे

एस एम जोशी कॉलेजला NAAC मूल्यांकन समितीचा ‘ए’ ग्रेड दर्जा

हडपसर /पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
रयत शिक्षण संस्थेचे एस एम जोशी कॉलेजला दि.१८ व १९ फेब्रुवारी २०१९ रोजी बेंगलोर येथील NAAC मूल्यांकन समितीचे सदस्य डॉ. शिरीष कुलकर्णी (गुजरात)डॉ.सुर्या प्रकाश राव (उत्तरप्रदेश ) डॉ.दीपनिताल चक्रवर्ती ( अगरतळा ) या त्रिसदस्यीय सदस्य समितीने भेट देऊन पाहणी केली.व आपला अहवाल सादर केला. सदर अहवालाचे अवलोकन करून कॉलेजला सलग (दुसऱ्यांदा CGP _३.०३ ) देऊन ‘ए’ ग्रेड दर्जा बहाल केला. आशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी दिली आहे.
या समितीने कॉलेजमधील आर्ट्स कॉमर्स ,सायन्स,बी.सी.ए.,बी.बी.ए, बी.सी.एस.व पदवी, पदव्युत्तर विभाग, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका,शॉर्ट टर्म कोर्सेस, जिमखाना , एनसीसी,कमवा व शिका, एनएसएस, सिंथेटिक ग्राउंड, स्विमिंग पूल, सी ट्रिपलआय सेंटर, मुलींचे व मुलांचे वसतिगृह,विविध विभाग, उपक्रम,क्रायटेरिया यांचे समितीपुढे कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले व समन्वयक डॉ.एम.एल.डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण करण्यात आले होते. त्याचबरोबरआजी, माजी विद्यार्थी, टीचींग, नॉन टीचींग कर्मचारी, पालक यांची बैठक घेऊन कॉलेज विषयी उपक्रम, उपलब्ध सुविधा या विषयी माहिती घेतली होती.
कॉलेजला ‘ए’ गेड मानांकन प्रदान करण्यात आल्यामुळे कॉलेजच्या शिरपेचात आनखी एक मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या पाच वर्षापासून संस्था पदाधिकारी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य ,प्राध्यापक विद्यार्थी, पालक यांनी कॉलेजच्या सर्वांगीण गुणात्मक विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. त्याचे हे फळ आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये व हडपसर परिसरातील नागरी,यांच्यामध्ये आनंदाचे, चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉलेजच्या या ए ग्रेड मानांकन प्राप्त झाल्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील  सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे  सहसचिव प्रिं. डॉ. विजयसिंह सावंत, पश्चिम विभागीय चेअरमन राम कांडगे  रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी. सदस्य  दिलीपआबा तुपे, चेतन तुपे पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितेचे  सदस्य  अशोक (आप्पा)तुपे, प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले,उपप्राचार्य डॉ.  अशोक धुमाळ,समन्वयक डॉ.एम.एल.डोंगरे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केले. व पुढील  कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comment here