पुणे

हडपसर येथील लॉजमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हडपसर पोलिसांची कारवाई

हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
हडपसर परिसरातील शिवम लॉजवर छापा घालून हडपसर पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. तर त्यांच्याकडून देह विक्रय व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे. प्रसाद वसंत हेगडे (४०, मोरवाडी सेंट्रलच्या पाठीमागे, पिंपरी) व मारुती मरिबा मोरे (२८, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील माळवाडी परिसरातील शिवम लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बनवाट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा घातला. त्यावेळी २ महिलांची सुटका करण्यात आली. तर त्यांना पैशांचे अमिष दाखवून जबरदस्तीने देह विक्रय करून घेणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्यावर पीटा अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया गावडे, कर्मचारी संपत औचरे, साहेबराव सोनवणे, प्रताप गायकवाड, संतोष जाचक, सैदोबा भोजराव, गणेश दळवी, गोविंद चिवळे, महिला कर्मचारी रुपाली टेंगले यांच्या पथकाने केली.

Comment here