पुणे

कृषी महाविद्यालयाला लागतेय भ्रष्टाचाराची किड… शिपायांपासून सर्वच मागतात बिल काढायला पैसे

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

कृषी महाविद्यालय पुणे येथे सुरेश शेट्टी या कष्टकरी गरीब तरूणाचे चहाचे कैंटीन असुन कृषी महाविद्यालयाने त्यांना तात्पूर्त्या स्वरूपात कैंटीन चालवण्याची परवानगी दिलेली आहे. या युवकाचे किरकोळ असलेले बिल काढण्यासाठी विद्यालयातील शिपाई पैसे व दारूची मागणी करीत असल्याने कृषी विद्यालयात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येत आहे.

पहा व्हिडीओ….

शिपाई संदेश अचळे चहाची बिल पास करुन घेण्यासाठी त्यांच्या कडे कधी पैसे तर कधी दारु ची मागणी करीत होता, नाहीतर बिल काढणार नाही अशी धमकी देत असे,
आधिच दिवसाची कमाई 100ते 200 रुपये होत असताना त्यातही कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या घशात हजार, पाचशे घालावे लागत असल्याने
या लाचखोर वृत्तीला कंटाळुन सुरेश शेट्टी यांनी वरिष्ठांकडे अनेक वेळा कैफियत मांडली पण काही एक वरिष्ठांनी दखल घेतली नाही. अखेरीस त्यांनी रोकठोक महाराष्ट्र न्युज चॅनलशी संपर्क साधून घडलेला प्रकार कथित केला…
सत्यता जाणुन घेतल्या हाती मिळालेल्या पुराव्यानुसार कृषी महाविद्यालयात लाचखोरीची कीड लागली आहे याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही,
यासंदर्भात व्यवस्थापनाचे एजाज सिकन्दर सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलल्याने प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

यासंदर्भात आता आपण फिर्यादी व्यक्ती ची तक्रार ऐकलीत आता व्हायरल होणारी क्लिप ऐका शिपाई संदेश अचळे पैसे कसे मागतोय

Comment here