पुणे

गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजप व गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव यांचे आवाहन

 

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)-

विजय मल्ल्या,नीरव मोदी यांना केलेले सहाय्य,नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), राफेल घोटाळा यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका सामान्य लोकांच्या गळ्यात धोंडा बांधण्याची आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गिरीश बापट यांनी सत्तेवर आल्यावर कष्टकऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेतली. त्यामुळे गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. कोणत्याही उमेदवाराच्या आणि पक्षाच्या विरोधी मतदान करण्याचे जाहीर आवाहन करण्याची आढावांची ही पहिलीच वेळ असून पुण्यात कष्टकरी,हमाल हा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे,त्यामुळे बाबा आढाव यांची ही भूमिका बापट यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.

Comment here