अकोला

पत्रकारांच्या टोलमाफीसाठी कटिबद्ध-ना.एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पाठपुरावा

अहमदनगर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून राज्यातील पत्रकारांना टोलमाफी साठी लवकरच निर्णय घेऊ असे सूतोवाच सार्वजनिक बांधकाम तथा आरोग्य मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी समवेत बोलताना केले. अकोले शासकीय विश्रामगृहात डॉ.भोर यांच्या वाढदिवसानिमित्त आले असता अकोले विश्रामगृहावर पत्रकारां च्या टोलमाफी च्या मागणीवर ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, जेष्ठ पत्रकार डि. के वैद्य, शांताराम गजे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा प्रसिदी प्रमुख भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, कार्याध्यक्ष हेमंत आवारी, अमोल वैद्य, अल्ताब शेख, शिवाजी पाटोळे आदि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पत्रकार संरक्षण कायदा देखील राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात आला असुन लवकरच स्वाक्षरी होवून अमंलबजावणी करण्यात येईल व टोलमाफी च्या विषयावर त्यांनी सकारात्मक चर्चा केली तातडीने लक्ष घालून आपण हा निर्णय घेवु असेही नामदार शिंदे म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व टोलमाफी च्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
जेष्ठ पत्रकार डिं. के वैद्य यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Comment here