पुणे

निनावी पत्र पाठविणे हा खोडसाळपणा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा डाव ; शहराध्यक्ष चेतन तुपे यांची टीका

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वधर्मसमभाव मानणारा, शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित पक्ष आहे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये विविध धर्मातील घटकांना सामावून घेऊन राजकारण व समाजकारण केले आहे, निनावी पत्राद्वारे पुणे शहरात कोणीतरी खोडसाळपणा केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा निषेध करत असल्याचे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले.
नुकताच पुणे शहरात कोणीतरी खोडसाळपणे वरिष्ठांना पत्र पाठवून हे पत्र मीडिया व सोशल मीडिया मध्ये प्रसिद्ध केले यामध्ये शहराध्यक्ष व पक्षाला बदनाम करण्याचा हेतू असेल, मराठा समाजाला जास्तीत जास्त प्राधान्य दिल्याचे पत्रात म्हटले आहे, प्रत्यक्षात पुणे शहर कार्यकारणी बनवीत असताना 21 सेल कार्यरत आहे त्यापैकी आठ सेलवर मराठा समाजाचे कार्यकर्ते असून 13 सेलवर विविध घटक, जात व विविध धर्मातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे यामध्ये अल्पसंख्यांक व सर्व समाजाचाही प्राधान्याने विचार केला असल्याचे चेतन तुपे यांनी यावेळी सांगितले.
पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक मुस्लिम समाजाला उमेदवारी देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे इतर पक्षाच्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिका निवडणूक असेल किंवा पक्षी कार्यकारणी असेल विविध घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे जातिवाद जोपासणारा आमचा पक्ष नसून शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही तळागाळापर्यंत कार्य करीत असतो असेही ते पुढे म्हणाले.
कोणीतरी खोडसाळपणे निनावी पत्र टाकून प्रसिद्धीमाध्यमे व सोशल मीडियावर प्रसिद्ध करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय शरद पवार यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे शरद पवार यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजाचे दोन व शीख समाजाचा एक महापौर पुणे शहराला दिला आहे, यामध्ये सर्वसमावेशक राजकारण दिसून येते.
त्याबरोबरच मागील निवडणुकांमध्ये स्वीकृत सदस्य नेमताना इतर घटकांना आणि विद्यमान परिस्थितीमध्ये स्वीकृत नगरसेवक जो आमच्या वाट्याला एक आला तेव्हा एसटी समाजाचा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून नेमला अशी विचारधारा पक्षाचीआहे
माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये पुणे शहराची कार्यकारणी नेमताना 122 पदाधिकाऱ्यांनी पैकी 77 पदाधिकारी आदिवासी, एन टी, एस सी, ओबीसी, अल्पसंख्यांक, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा समाजातील सर्व घटकांना बरोबर घेण्याचे धोरण आम्ही प्रत्यक्षात आणले आहे.

कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या हेतूने निनावी पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा समाजात मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित दादा पवार, सुप्रिया ताई यांनी नेहमी समाजातील सर्व घटक, सर्व धर्मातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याचे मार्गदर्शन केले आहे
अशापद्धतीने निनावी पत्र पाठवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.

चेतन तुपे – शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x