पुणे

शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ लीला गांधी, लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी नृत्यांगणा वर्षा परितेकर, बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर आदीनाथ विभूते यांना जाहीर

पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)


पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांना जाहीर झाला आहे. लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी नृत्यांगणा वर्षा परितेकर यांना व पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर आदीनाथ विभूते यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे आणि अध्यक्ष देवीदास पाटील यांनी दिली. 

लोककला क्षेत्रासाठी योगदान देणार्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने कांताबाई सातारकर, सरस्वतीबाई कोल्हापूरकर, चंद्राबाई तांबे, शाहीर बाबूराव काटे अशा जुन्या पिढीतील नामवंत कलावंताना सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्काराचे हे २२ वे वर्ष आहे. शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार १५ हजार रुपये आणि बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार २९ डिसेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी दुपारी दोन ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आहे.अशी माहिती कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे,डाॅ. शंतनु जगदाळे,रेश्मा परितेकर,मित्रावरून झांबरे,संदिप घुले,नाना नलावडे,बापू जगताप,रामदास खोमणे यांनी दिली.

कार्यक्रम विनामूल्य आहे. महिलांसाठी बाल्कनी राखीव आहे. विजयता आणि कल्याणी नगरकर, रेश्मा आणि वर्षा परितेकर, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट, अशा संगीत पार्टींचे कलावंत आपली कला लावणी महोत्सवात सदर करणार आहेत.

 

Facebook Page

‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ लीला गांधी, लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी नृत्यांगणा वर्षा परितेकर,…

Posted by Rokhthohk Mahararshtra News on Wednesday, December 25, 2019

Comment here