पुणे

केंद्र सरकारने शरद पवार यांचे संरक्षण काढले आमदार रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचारावरून भाजपवर टीकास्त्र सो़डल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आता रोहित पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.

कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
पवारांच्या या गंभीर आरोपामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा आतापर्यंत तपास करुन आजवर सत्तेत असलेल्या भाजप सरकारने यामागील मेंदू आणि रक्ताने माखलेले हात शोधून त्यांना मुसक्या घालायला पाहिजे होत्या. पण या हिंसाचाराचा तपास महाविकास आघाडी सरकारने विशेष तपास पथकामार्फत निःपक्षपणे करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यावरून आता रोहित पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. यावरून आता भाजप विरुद्ध ठाकरे सरकार अशा संघर्ष पुढील काळात पेटणार आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा आतापर्यंत तपास करुन आजवर सत्तेत असलेल्या भाजप सरकारने यामागील मेंदू आणि रक्ताने माखलेले हात शोधून त्यांना मुसक्या घालायला पाहिजे होत्या. पण या हिंसाचाराचा तपास महाविकास आघाडी सरकारने विशेष तपास पथकामार्फत निःपक्षपणे करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर दोन वर्षे झोपेचं सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने खडबडून जागं होऊन हा तपास ‘एनआयए’कडे दिला. हा निर्णय आताच का घेतला याबाबत लोकांच्या मनात अनेक वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या आहेत.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा आतापर्यंत तपास करुन आजवर सत्तेत असलेल्या भाजप सरकारने यामागील मेंदू आणि रक्ताने माखलेले हात शोधून त्यांना मुसक्या घालायला पाहिजे होत्या. पण या हिंसाचाराचा तपास महाविकास आघाडी सरकारने विशेष तपास पथकामार्फत निःपक्षपणे करण्याचा निर्णय घेतला.”

दुसर्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे, ”त्यानंतर दोन वर्षे झोपेचं सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने खडबडून जागं होऊन हा तपास ‘एनआयए’कडे दिला. हा निर्णय आताच का घेतला याबाबत लोकांच्या मनात अनेक वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या आहेत.”

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x