पुणे

मृण्मयी अनिरुद्ध तुपे यांचे अल्पशा आजाराने निधन ; हडपसर व काटेवाडी मध्ये शोककळा

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
स्व.खासदार विठ्ठल तुपे पाटील यांची धाकटी सून, आमदार चेतन तुपे यांची भावजय मृण्मयी अनिरुद्ध तुपे (वय 33) यांचे अल्पशा आजाराने मगरपट्टासिटी येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या मागे सासू लीलावती विठ्ठल तुपे, पती अनिरुद्ध तुपे, एक मुलगी, दिर आमदार चेतन तुपे, जाऊ सोनल तुपे असा परिवार आहे.
स्व. खासदार विठ्ठल तुपे पाटील यांचा समर्थ वारसा डोळ्यासमोर ठेऊन मृण्मयी तुपे यांनी शैक्षणिक संस्थेत चांगले काम केले व नवी पिढी घडविण्यासाठी त्या अखंड कार्यरत होत्या, तुपे घराणे राजकारणात सतत सक्रिय घराणे असल्याने निवडणूक प्रचारात त्या हिरीरीने सहभागी होत असत.
त्यांच्या अंत्यविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगगनाथ शेवाळे, जगदीश मुळीक, दिलीप आबा तुपे, नगरसेवक मारुती आबा तुपे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी आमदार कमल ढोले पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर,  नगरसेविका हेमलता मगर, नंदा लोणकर, नगरसेवक अशोक कांबळे, प्रमोद नाना भानगिरे, गफार पठाण, शहाजी मगर, दत्तात्रय ससाणे, विकास रासकर, चंद्रकांत कवडे, भूषण तुपे, प्रशांत सुरसे, रुपेश तुपे, बाळासाहेब भिसे, संजय शिंदे, सागरराजे भोसले, दिलीप टकले, उद्योजक दशरथ जाधव, विकास तुपे, प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले, स्वप्नील धर्मे, आंतरराष्ट्रीय कारपटू संजय टकले, पत्रकार अनिल मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मृण्मयी तुपे या बारामती तालुक्यातील काटेवाडी गावच्या प्रतिष्ठित कुटुंबातील होत्या, त्यांच्या अचानक जाण्याने हडपसर व काटेवाडी गावावर शोककळा पसरली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x