पुणे

रोखठोक विशेष फ्लॅश न्युज….. कोरोना विरोधी लस लवकरच….. चाचणी यशस्वी झाल्यास सप्टेंबर मध्ये लस ; उपलब्ध दोन आठवड्यात लशीच्या चाचण्या घेणार – सिरमचे आदर पुनावाला यांची माहिती

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही कोरोनाच्या लशीच्या चाचण्यांवर काम करीत आहोत सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता यशस्वी झाल्यानंतरच सप्टेंबर- ऑक्टोबर पर्यंत ही लस बाजारात येऊ शकेल अशी आमची अपेक्षा आहे क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करण्यासाठी लशींचे उत्पादन करण्यात येईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली.
पहिल्या सहा महिन्यांसाठी सुमारे 50 लाख लसीचे उत्पादन घेण्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीबाबत पुण्यासह देशात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे त्याला या प्रक्रियेबद्दल सिरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी एक आठवड्यापूर्वीच लस येण्यास दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल असे सांगितले होते दरम्यान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावला यांनी लशींच्या चाचण्यांबाबत अद्ययावत घडामोडींची माहिती दिली लस तयार करणाऱ्या सात जागतिक संस्थांपैकी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लस प्रकल्पात भागीदारी केली आहेत तेथील डॉ. हिल यांच्यासह आमच्या तज्ज्ञांचे पथक काम करत आहेत
लसींच्या चाचण्यांमध्ये आवश्यक सुरक्षा आणि परिणामकारकता तपासून सप्टेंबर – ऑक्टोबर पर्यंत बाजारातील लस येऊ शकते इंग्लंडमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत क्लिनिकल चाचण्या यशस्वी होतील या अपेक्षेने आम्ही लस तयार करणार आहोत क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने उत्पादनाचा निर्णय घेतला आहे.
पुढच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत भारतातही चाचण्या सुरू करणार आहोत अशी माहिती पूनावाला यांनी दिली उत्पादनासाठी आमची पुण्यातील सुविधा आहे लसीसाठी नव्याने सुविधा तयार करण्यात आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो आमच्या सध्याच्या तयार असलेल्या एका युनिटचे उत्पादन सुमारे तीन आठवड्यात सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली नियमांचे पालन करूनच चाचण्या करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

चाचणीच्या किट्स उत्पादनाचे लक्ष्य
कोरोना चाचणीच्या किट्सचे उत्पादन करण्याचे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही नोकरीत “मायलॅब” या संस्थेशी भागीदारी केली आहे या किटची आठवड्याच्या उत्पादनाची क्षमता दीड लाख असून ते वीस लाखांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे अधिक प्रभावी लस विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
या आजारांचे तत्काळ निदान होईल  आणि त्यावर तातडीने उपचार सुरू होतील असे आमचे प्रयत्न आहेत कच्च्या मालासाठी आम्ही सिंजेन इंटरनॅशनलबरोबर भागीदारी केली आहेत त्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा होणार नाही असे आदर पूनावाला म्हणाले.

पहिल्या सहा महिन्यांसाठी लशीचे सुमारे 50 लाख तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे त्यानंतर चाचण्या यशस्वी वर आम्ही दरमहा शंभर कोटी वर्षे उत्पादन करू हे उत्पादन भारतासह अन्य अधिकाधिक देशांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
आदर पूनावाला
मुख्य कार्यकारी अधिकारी सिरम इन्स्टिट्यूट

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x