पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्यूज फ्लॅश…. गूड न्यूज; भारतातील ‘या’ ३ कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार; क्लिनीकल ट्रायललाही मंजूरी

 

भारतामध्ये कोरोनाने थैमान घातले असतानाच ३ कंपन्यांनी कोरोनाची लस तयार केली आहे. या तिन्ही
कंपन्यांना या लशीच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तिन्ही कंपन्यांना ही लस तयार करायला सांगितलं आहे. या तिन्ही कंपन्यांना लस फास्टट्रॅक बनवायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखलं जाऊ शकतं. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) डॉक्टर वीजी सोमाणी यांनी झी न्यूज डॉटकॉमला याबाबत माहिती दिली.

भारतीय कंपनी ग्लेनमार्क, केडिला हेल्थकेयर आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी कोरोना व्हायरससाठीची लस तयार केली आहे. तिन्ही कंपन्यांना लशी कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचं सुरुवातीच्या संशोधनात दिसलं आहे. आता भारतातल्या हॉस्पिटलमध्ये या लशी रुग्णांना देऊन बघाव्यात, असं कंपनीला सांगण्यात आलं आहे.
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार करण्यात आलेल्या  ChAdOx1 लसीची भारतात क्लिनिकल ट्रायल घेणार आहे. ग्लेनमार्कने  फाविपीराविर (Favipiravir) नावाची लस तयार केली आहे. तर केडिला हेल्थकेयरने कोरोना व्हायरसला मारण्यासाठी alfa-2b नावाची लस बनवली आहे. याच आठवड्यात या सगळ्या लशींच्या क्लिनिकल ट्रायलला सुरूवात होईल, अशी अपेक्षा आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x