दिल्ली

Rokhthok_Big_Breking_News LAC वर चीन पाठवतोय मार्शल आर्ट ट्रेनर, भारतीय सैन्याचे ‘घातक’ कमांडो यापूर्वीच ‘रेडी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत चीन वादाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनी मीडियानुसार, लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल म्हणजे एलएसीवर चीन, आपल्या सैन्याला ट्रेनिंग देण्यासाठी 20 मार्शल आर्ट ट्रेनर तिबेटला पाठवत आहे. 15 जूनच्या पूर्वीही चीनने मार्शल आर्ट ट्रेनरना तिबेटला पाठवले होते.
मात्र, आपल्या भारतीय सैन्याचे घातक कमांडो तेथे अधीपासूनच तैनात आहेत. सैन्याच्या प्रत्येक युनिटमध्ये घातक कमांडो असतात, जे शस्त्रांसह तसेच विनाशस्त्र लढण्यात तरबेज असतात.
चीन आपल्या या निर्णयाने माईंड गेम खेळण्याचा प्रयत्न करत असला, तरी भारतीय सैन्यात अगोदरच घातक कमांडो तैनात आहेत. भारतीय सैन्याचे कमांडो शस्त्रांशिवाय लढाई आणि शत्रूला आमने-सामनेच्या लढाईत नमवण्यात तरबेज आहेत.
15 जूनला झालेल्या हिंसक हल्ल्यापूर्वी सुद्धा चीनने तिबेटच्या स्थानिक मार्शल आर्ट क्लबमधील फायटरना सैन्याच्या डिव्हिजनमध्ये तैनात केले होते. भारत आणि चीनच्या दरम्यान 1996 मध्ये झालेल्या करारानुसार एलएसीपासून दोन किलोमीटरच्या परिघात फायरिंग करून नये आणि तसेच कोणतेही घातक रासायनिक शस्त्र, बंदूक, स्फोटके यांना परवानगी नाही. यासाठी येथे शस्त्रांचा वापर होत नाही. 15 जूनला

Comment here