पुणे

Rokhthok_Big_Breking_News “या” घटनेने पुण्यात होतोय संताप पुण्यात पती व मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देवून बलात्कार

पुणे : – शहरांतील विविध भागात महिलांवर अत्याचाराच्या तीन घटना घडल्याचे समोर आले आहे. धमकी, लग्नाचे आमिष देऊन महिलांवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंहगड रोड, भारती विद्यापीठ आणि वारजे माळवाडी परिसरात या घटना घडल्या आहेत.
सिहंगड रोड परिसरात एका विवाहित महिलेला पती व तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला आहे. याप्रकरणी प्रबोधन मोरे ( २५, रा. ज्ञानेश्वर नगर, कोंढवा) याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोंढवा येथील एका 30 वर्षीय महिलेनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 मे ते 4 जून दरम्यान घडला आहे.
तर दुसरी वारजे माळवाडी भागात घडली असून, तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी तेजस हिवाळे (23, रामनगर वारजे माळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तिसऱ्या घटनेत 36 वर्षीय महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने बलात्कार केला. तर तिच्याकडून पैसे देखील घेतले आहेत. या प्रकरणी संदीप लहू शिंदे ( 25, उंदिरखेड, पारोळा, जळगाव) याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2017 ते मार्च 2020 दरम्यान आंबेगाव पठार तसेच पुण्यातील विविध लॉजवर हा प्रकार घडला.

Comment here