पुणे

Rokhthok_Big_Breking_News “या” पोलिसांची धडाकेबाज कारवाई 8 वर्षापासून फरार सराईत गुन्हेगार, कोंढवा पोलिसांनी ‘कोरोना’चा सर्व्हे सांगत आवळल्या मुसक्या

पुणे : – जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार घरी असल्याची माहिती मिळाल्यावर कोरोना पेशंटचा सर्व्हे करीत असल्याचे सांगत कोंढवा पोलिसांनी ८ वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराला पकडले.
योगेश बुद्धीराम माळी (वय ३२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो जून २०१३ पासून पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी कोंढवा पोलिसांनी शक्कल लढवत त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.
कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस नाईक कौस्तुभ जाधव यांना योगेश जाधव हा घरी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्याने अनेकदा पोलिसांना गुंगारा दिला असल्यामुळे कोंढवा पोलिसांनी यावेळी काळजी घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इक्बाल शेख, हवालदार योगेश कुंभार, गणेश आगम, दीपक क्षीरसागर, सुशिल धिवार, मोहन मिसाळ, उमाकांत स्वामी हे पथक महापालिकेचे कर्मचारी बनले. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्व्हे करण्याचा बहाणा त्यांनी केला व योगेश याच्या घराबाहेर सापळा लावला.
पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी घरात प्रवेश केला. तेव्हा त्याचे कुटुंबीय घाबरले होते. त्यांची भेदरलेली अवस्था पाहून व आरोपी पूर्वइतिहास लक्षात घेऊन शिंदे यांनी आपण महापालिकेकडून आलो आहे. ते रहात असलेल्या परिसरामध्ये व अवतीभोवती कोरोना पेशंट असल्याची माहिती मिळाली. सर्व्हे करीत आहोत, असे सांगून कुटुंबातील लोकांची माहिती विचारली. सर्वांना समक्ष आणा, त्यांना ताप, खोकला काही आहे का हे पहायचे आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कुटुंबियांनी योगेश माळी याला समोर आणले. तो आपल्या टप्प्यात असल्याचे लक्षात आल्यावर शिंदे यांनी व बरोबरच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले.
२०१३ पासून जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या योगेश माळी याला पकडण्यात कोंढवा पोलिसांना यश आले.सदरची कामगिरी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे ,सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार ,पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांच्या पथकाने केली .

Comment here