पुणे

शरद पवारांकडून नगरसेवक दत्ता साने यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन!

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचं 4 जुलै रोजी कोरोनामुळे निधन झालं. साने यांच्या निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे साने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

नगरसेवक दत्ता साने यांचा 4 जुलै रोजी कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र महत्वाचा शिलेदार गमावल्यानंतर शरद पवारांनी सानेकाकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे.

साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना त्यांना कोरोना संसर्ग झाला होता.

दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यासह जिल्ह्यातील इतर भागात सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे.

Comment here