मुंबई

महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही : फुटला तरी….जयंत पाटील

मुंबई: देशात राजकीय समीकरणे झपाट्याने वाढत आहेत. मध्यप्रदेश नंतर राजस्थानमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु आहे. बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसने सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखील ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्यासाठी राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तरी तीन पक्षांच्या ताकदीसमोर तो निवडूनच येणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती होण्याचा प्रश्नच नाही’

महाराष्ट्रात कोरोना काळात राजकारण देखील देखील पेटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसला स्वतंत्र लढण्यासाठी आव्हान दिले होते. आज जयंत पाटील यांनी देखील भाजप स्वतंत्र लढलं तर त्यांच्या ६० ते ६५ जागा निवडून येतील असा दावा केला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x