पुणे

डॉक्टरांच्या पार्टीवर कारवाई करत 11 डॉक्टरांसह मोठ्या हॉटेलच्या 2 मालकांवर गुन्हा दाखल

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीवर आणि एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या मिरवणुकीवर कारवाई करत गुन्हे दाखल केल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर पोलिसांनी डॉक्टरांच्या एका पार्टीवर कारवाई करत 11 डॉक्टरांसह मोठ्या हॉटेलच्या 2 मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमाशेत येथील एका हॉटेलमध्ये काही डॉक्टर गर्दी करून पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असताना देखील ओली सुखी पार्टी करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई विकास मोरे यांसह आदींनी सदर ठिकाणी जात छापा टाकला.

त्याठिकाणी पोलीस आल्याची माहिती मिळताच सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले त्यावेळी पोलिसांनी तेथे पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल 11 डॉक्टर एकत्र येऊन तेथे पार्टी करत असल्याचे आढळून आले.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विकास मोरे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर सणसवाडी तसेच परिसरातील 11 डॉक्टरांसह हॉटेलच्या 2 मालकांवर देखील गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

Comment here