पुणे

प्रवासात ओळख करून चार महिन्याचे बाळ लांबविले – हडपसर पोलिसांचा कसून तपास सुरू

पुणे / हडपसर : –   बसप्रवासात बोलण्यातून महिलेशी ओळख करून त्यांना नाष्टा करण्यास हडपसर भागात थांबवून तिच्याजवळील 4 महिन्यांचे बाळ पळवून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्या अपहरणकर्त्या महिलेचा शोध सुरू केला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपहरणकर्त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नगर जिल्ह्यातील लोणी गावची आहे. पतीसोबत वाद झाले होते. त्यामुळे त्या रागाच्या भरात महिला घरातून आपल्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन बाहेर पडली. त्यानंतर नगरमध्ये आली आणि तेथून नगर ते सातारा या बसमध्ये बसली. त्याचवेळी आणखी एक महिला त्या सीटवर येऊन बसली. काही वेळाने त्या महिलेने फिर्यादी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याशी ओळख वाढवली. दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. तेथून आरोपी महिला तिला घेऊन हडपसर भागात गेली. दोघीही चायनीज खाण्यास डी.पी. रोडवर गेले. चायनीज खात असताना अचानक आरोपी महिलेने फिर्यादी यांच्याजवळील बाळ हातात घेतले. तसेच त्यांना खाऊन घेण्यास सांगितले. मात्र, याच वेळी महिला बाळाला घेऊन पसार झाली. यानंतर फिर्यादी यांनी महिलेचा काही वेळ शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला. अद्याप तिचा शोध लागला नाही.

सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच महिलेला पकडले जाईल, महिलेला हा परिसर माहिती असावा, अशी शक्यता आहे. महिला 20 ते 22 वर्षांची आहे. अंगात लाल झब्बा आणि जीन्स पॅन्ट होती, तर तिने डोळ्यांना मोठ्या प्रमाणात काजळ लावलेले असून, मोठा बिंदू लावला आहे, या महिलेला कोणी पाहिल्यास पोलिसांशी संपर्क करावा.

बाळकृष्ण कदम
वरिष्ठ पोलिस निरीक्षक – हडपसर

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x