पुणे

सगळ्या पदवीधर उमेदवारांना ‘कात्रजचा घाट दाखवून संभाजी ब्रिगेड’चे उमेदवार इंजि मनोजकुमार गायकवाड हे मोठ्या मताधिक्यने विजयी होणार – संतोष शिंदे

पुणे पदवीधर निवडणूक आणि पदविधर मतदारसंघ राजकीय नेत्यांचा ‘पुनर्वसन’ कार्यक्रम नाही. पदवीधरांचे नेतृत्व तरुणांनी करावं. मात्र आजपर्यंत सुशिक्षित पदवीधर तरुणांची दिशाभूल करून सगळ्या पक्षांनी घराणेशाहीचा पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवला. संभाजी ब्रिगेड हा पुनर्वसनाचा कार्यक्रम उद्ध्वस्त करून राजकीय ‘स्पेस’ निर्माण करणार आहे. पदवीधरांच्या हक्कासाठी आजपर्यंत कुठलाही निवडून आलेला उमेदवार बोलला नाही, तो फक्त राजकीय सेटलमेंट करून स्वतःची दुकानदारी चालवत राहिला. आम्हाला आमच्या हक्काचा उमेदवार पाहिजे. पदवीधर हा वयस्कर लोकांचा पुनर्वसनाचा कार्यक्रम नाही तर पदवीधरांचे नेतृत्व करणारा तरुण सुशिक्षित उमेदवार पाहिजे. म्हणून संभाजी ब्रिगेडने तरूण इंजि. मनोज कुमार गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.

“मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी पदवीधर आमदार म्हणून पुणे मतदार संघाचे नेतृत्व केलं. मात्र पदवीधरांचा आमदार म्हणून कधीही पुण्यासह इतर जिल्ह्यात पाय ठेवला नाही, ते पक्षाचे नेते व मंत्री म्हणून मिरवले, मंत्रीमंडळात दोन नंबरचे मंत्री पद असतानाही त्यांनी पदवीधरांचा एकही प्रश्न सोडवला नाही.ते फक्त पक्ष कसा वाढेल विरोधकांना कुरघोडी कशी करता येईल पक्षातील अंतर्गत वाद मितवण्यातच वेस्त होते,आणि म्हणून चंद्रकांत पाटील यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. कारखाना दारांना आणि वयाची पन्नाशी पार करणाऱ्यांना उमेदवारी देऊन दोन्ही पक्षांनी काय साध्य केलं. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार चालू आहे.
भाजप, राष्ट्रवादी व इतर राजकीय पक्ष हे भांडवलदारांचे दलाल आहेत. डुप्लिकेट आणि बेगडी माणसं आमचं खोटं नाव वापरून मिरवत आहेत. निवडणुकीत मतांची भीक मागत आहेत. हे खोटारडे आणि डुप्लिकेट माणसांना पदवीधर निवडणुकीत आम्ही कात्रजचा घाट दाखवणार आहे. आणि मंत्रालयावर पदवीधरांचा पहिला ‘झेंडा’ संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून फडकवणार आहोत.प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर,प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचा पुणे जिल्ह्यासह,सोलापुर, सातारा,सांगली,कोल्हापुर जिल्ह्यात झंझावाती प्रचार चालू आहे,त्यामुळे फसवेगिरी आणि बेगडी लोकांचं पानिपत होणार हे नक्की… असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेड हे १००% समाजकारण व १००% राजकारण ही भूमिका घेत शिव-फुले-शाहू-आंबेडकर या कृतिशील विचारांनी चालणारे पक्ष-संघटन आहे. पुणे-सोलापूर येथील तरुण उद्योजक इंजि. मनोज कुमार गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक विद्यार्थी प्रश्न तसेच शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने झालीत. एका तरुण उद्योजकाला संधी देण्याच्या उद्दिष्टाने व बहुजन विचारधारा जनमानसात रुजविणे च्या दृष्टीने संभाजी ब्रिगेड’ची उमेदवारी इंजि. मनोजकुमार गायकवाड यांना देण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड’चे अधिकृत उमेदवार इंजि. मनोजकुमार गायकवाड यांना,पुणे जिल्हा बळीराजा शेतकरी संघटना, मानव अधिकारी संघटना, सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र, शेतकरी संघटना (रुघनाथ दादा पाटील) शिक्षक संघटना,विद्यार्थी संघटना, शिरूर, खेड, हवेली, बार असोसिएशन यांसह अनेक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे, याबाबत पत्रकार भवन येथे संभाजी ब्रिगेड’चे अधिकृत उमेदवार इंजि मनोजकुमार गायकवाड व मा.जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली,

यावेळी संभाजी ब्रिगेड पूणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिरूर लोकसभा अध्यक्ष सुनील वाडेकर,हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सोनु शेलार, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक कावरे, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष भोसले, उपाध्यक्ष मयुर धर्मधिकारी बळीराजा शेतकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष गणेश गणगे,शेखर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x