दिल्ली

Corona vaccine : ‘सीरम’कडून लसीच्या ‘तात्काळ’ मान्यतेसाठी औषध महानियंत्रकांकडे अर्ज

नवी दिल्ली : ऑनलाईन – दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली. अन संपूर्ण वातावरण अस्थिर झाले. कोरोनाप्रतिबंधक लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पुढील वर्षच्या सुरुवातीलाच लस मिळणार असे वाटत असताना पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या कोरोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे दिलेल्या अर्जात महामारीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं दिल्याचे इंडिया टुडेचे वृत्त आहे. ब्रिटनने ‘फायझर’ची कोरोनाप्रतिबंधक लसीला याआधीच परवानगी दिली असून हि लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला असतानाच ही माहिती समोर आली आहे.

स्पुटनिक ५ लशीची भारतात निर्मिती
सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.

गेल्या महिन्यात सीरमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारेच लस लवकरात लवकर उपलब्ध होण्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाऊ शकतो असं आयसीएमआरने म्हटलं होतं. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, सीरमने आधीच चार कोटी डोसची निर्मिची केली आहे. अधिकृत सूत्रांनुसार, सीरमने आपल्या अर्जात म्हटलं आहे की, चार वैद्यकीय चाचण्यांचा डेटा कंपनीकडून एकत्रित करण्यात आला आहे. यामध्ये युकेमधील दोन, ब्राझील, भारतातील चाचण्यांचा समावेश आहे. याआधारे कोविशिल्ड कोरोनाविरोधात अतिशय प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

भारताला आत्मनिर्भर करण्यास तसंच पंतप्रधानांचं व्होकल फॉर लोकल आणि मेकिंग इन इंडियाचं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी सीरम कटिबद्द आहे. कोरोना काळात उदभवलेली परिस्थिती पाहता देश आणि जगभरातील लाखो लोकांचा जीव वाचवण्यासााठी लवकरात लवकर लस उपलब्ध होणं गरजेचं असल्याचंही सीरमने आपल्या अर्जात म्हटलं आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x