पुणे

भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर खंडणी आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे :  – भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (former minister Girish Mahajan) यांच्यासह 28 जणांवर जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करत डांबून मारत 5 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे राजीनामे देण्यासाठी हा प्रकार घडला असल्याचे म्हंटले आहे. या गुन्ह्यानंतर पुण्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात गिरीश महाजन, तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जळगाव येथील असून, ते वकिल आहेत. तर ते जळगाव मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना स्क्वाडा गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी त्यांचे हात-पाय बांधून डांबून ठेवले. यानंतर त्यांना मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर जळगाव येथे जाऊन संस्थेत घुसून तोडफोड केली. तर त्यांच्या खिश्यातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला आहे. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त चव्हाण हे करत असून, त्यांनी गिरीश महाजन यांचे नाव असून, या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x