महाराष्ट्र

चिक्की नंतर “पंकजा मुंडे” यांचा 106 कोटींचा ‘मोबाईल’ घोटाळा उघडकीस: “धनंजय मुंडे” यांच्या आरोपाने राज्यात खळबळ

मुंबई:  (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)
राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या महिला व बालविकास विभागात १०६ कोटी रुपयांचा आणखी एक मोबाईल घोटाळा उघडकीस आला आहे. अंगणवाडी सेविकांसाठी खरेदी करावयाच्या सहा हजार रुपये किंमतीच्या मोबाईलची आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांनी खरेदी करुन हा घोटाळा करण्यात आला असल्याचा गंभीर  आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.  या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत अधीक माहिती अशी की, राज्यातील एक लाख वीस हजार अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी ॲन्ड्राईड बेस्ड मोबाईल फोन खरेदी करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने २८ फेब्रुवारी, २०१९ रोजी घेऊन तशा प्रकारचा शासन आदेश काढला होता.मे. सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि. या पुरवठा दारांकडून पॅनॉसानिक ईलुगा आय-सेव्हन या कंपनीचे मोबाईल फोन प्रत्येकी आठ हजार आठशे सत्याहत्तर याप्रमाणे खरेदी करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.  त्यासाठी विभाग १०६ कोटी ८२ लाख १३ हजार ७९५ रुपये खर्च करणार आहे.  मात्र या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मंत्रालयासमोरील त्यांच्या बी-४ या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी किरकोळ ऑनलाईन बाजारात हा फोन सहा हजार ते साडे सहा हजार रुपयांमध्ये उपलब्ध असतांना विभागाने मात्र घाऊक किंमतीत एक लाख वीस हजार मोबाईल खरेदी करतांना त्यापेक्षा कमी किंमतीने खरेदी करण्याची आवश्यकता असतांना आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांना खरेदी करुन हा भ्रष्टाचार केला असल्याचा दावा केला.सदर पुरवठादार कंपनीने या मोबाईलची किंमत आठ हजार आठशे सत्त्याहत्तर पेक्षा कमी करणार नसल्याचे कळविल्यानंतरही याच पुरवठा दाराकडून खरेदी का केली,  याच किंमतीत यापेक्षा चांगल्या स्पेसिफिकेशनचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मोबाईल बाजारात उपलब्ध असतांना बाजारात उपलब्ध न होणारी आणि बंद पडलेल्या कंपनीचे मोबाईल का खरेदी केले असा सवाल  मुंडे यांनी केला आहे.

हा मोबाईल सध्या बाजारात कुठेही उपलब्ध नाही.  त्याचे उत्पादन कंपनीने चार महिन्यापुर्वीच बंद केलेले असतांना कंपनीचा जुना माल विक्री करण्यासाठी विशिष्ठ पुरवठादाराला मदत करण्यासाठीच सरकारचे १०६ कोटी रुपये उधळले असल्याचा गंभीर आरोप  मुंडे यांनी केला.ज्या कंपनीला हे १०६ कोटी रुपये किंमतीचे मोबाईल पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीची अधिकृत शेअर कॅपीटल फक्त ५ कोटी ५० लाख आणि पेड अप कॅपीटल केवळ ४ कोटी ९२ लाख ६५ हजार इतके असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

यापुर्वी देखील विभागाने मोबाईल खरेदी करीत असतांना अनाकलनिय रित्या अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या उत्पादनालाच निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची अट टाकल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊनही पुन्हा अशाच प्रकारे खरेदी होत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.  या मोबाईलच्या खरेदीच्या निर्णयात तातडीने स्थगिती देऊन या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी  मुंडे यांनी केली आहे. याआधी झालेल्या चिक्की असो की डाळ घोटाळा, कोणत्याही घोटाळ्याची मुख्यमत्र्यांनी चौकशी केली नसून तुम खाते रहो हम संभालते रहेंगे हीच त्यांची पारदर्शकता असल्याचा टोलाही लगावला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
7 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Hοwdy јust wanted to give you a quick heads up and let you
know а few of the imagеs aren’t loadіng correctly.
I’m not sure why but I thіnk its a linking issue.
I’ve tried it in two differеnt internet browsers and boh show the same results. http://dhi.org.mx/wiki/index.php?title=Web_Jasa_Backlink_Murah_Berkualitas_Terbaru:_8_Masalah_Terunggul_Tentang_Jasa_Backlink_Murah

safetoto
1 year ago

It’s too bad to check your article late. I wonder what it would be if we met a little faster. I want to exchange a little more, but please visit my site safetoto and leave a message!!

7 months ago

Just desire to say your article is as astonishing.

The clarity to your post is simply great and
i can suppose you’re an expert on this subject.
Fine together with your permission let me to grasp your feed
to keep up to date with impending post. Thanks a million and please continue the gratifying work.

7 months ago

Hey, I think your site might be having browser compatibility issues.
When I look at your website in Chrome, it looks fine but when opening in Internet Explorer,
it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up!
Other then that, wonderful blog!

6 months ago

What a data of un-ambiguity and preserveness of valuable familiarity about unpredicted feelings.

2 months ago

La compatibilidad del software de rastreo móvil es muy buena y es compatible con casi todos los dispositivos Android e iOS. Después de instalar el software de rastreo en el teléfono de destino, puede ver el historial de llamadas del teléfono, mensajes de conversación, fotos, videos, rastrear la ubicación GPS del dispositivo, encender el micrófono del teléfono y registrar la ubicación circundante.

2 months ago

Cuando intenta espiar el teléfono de alguien, debe asegurarse de que no encuentren el software una vez que esté instalado.

Comment here

7
0
Would love your thoughts, please comment.x
()
x