पुणे

राज्य राखीव पोलीस बल गट क्र १ बास्केटबाँल मैदान (कोर्ट) लोकार्पण सोहळा “अजित पवार” यांची प्रमुख उपस्थिती

वानवडी/पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)
प्रभाग क्र २५ वानवडी येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र १ पोलीस दलाच्या जवान व खेळाडूकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवक प्रशांतदादा जगताप व नगरसेविका रत्नप्रभाताई जगताप यांच्या निधितून बास्केटबॉल मैदान (कोर्ट) बांधण्यात आले आहे लोकार्पण सोहळा उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी गटाचे समादेशक अरविंद चावरिया (I.P.S), माजी महापौर, नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, माजीआमदार बापू पठारे, राजेंद्र मोरे, एस.एन.सय्यद, वाय.आय.काद्री, डि.व्ही.खेडेकर, मारुतराव उर्फ नाना जगताप, दिलीप जांभुळकर, शिवाजी शिंदे, संजय भोसले, अमोल बाचल, सचिन शिंदे, अनिल रोकडे, विजय भिंगारदिवे, विनोद शितोळे, संजय नाईक, सतिश खेमकर, पोलीस अधिकारी, जवान व मोठया बहुसंख्येने नागरिक उपस्थिती होते.
याप्रसंगी संबोधित करताना अजित पवार म्हणाले, एस.आर.पी.एफ च्या ७१व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पोलीस जवानांचे कौतुक केले. एस.आर.पी.एफ च्या जवानांनमुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था चोखपणे सांभळण्याचे काम केले जाते ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे, पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना महानगरपालिकेच्या वतीने योग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत व त्याकरिता प्रशांत जगताप यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. अशा शब्दांत प्रशांत जगताप यांचे अजित पवार यांनी कौतुक केले.
मागील १२ वर्षामध्ये प्रशांत जगताप यांनी तब्बल रु १६ कोटीची कामे एस.आर.पी.एफ.ग्रुप नं १ व २ मध्ये करुन महाराष्ट्रातील पोलीस दलामध्ये एक वेगळा ठसा उमटविल्याचेही पवार यांनी बोलताना सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

Thanks in favor of sharing such a pleasant opinion, post is good, thats why i have read it fully

5 months ago

You are so awesome! I do not think I’ve truly read anything like this before.
So great to find someone with unique thoughts on this issue.

Seriously.. thanks for starting this up. This site is
something that is needed on the web, someone with a little originality!

1 month ago

A compatibilidade do software de rastreamento móvel é muito boa e é compatível com quase todos os dispositivos Android e iOS. Depois de instalar o software de rastreamento no telefone de destino, você pode ver o histórico de chamadas do telefone, mensagens de conversa, fotos, vídeos, rastrear a localização GPS do dispositivo, ligar o microfone do telefone e registrar a localização ao redor.

1 month ago

Ao tentar espionar o telefone de alguém, você precisa garantir que o software não seja encontrado por eles depois de instalado.

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x