पुणे

केन्द्रीय आयुष मंत्री श्रीपद नाईक यांची महाराष्ट्र आरोग्य मंडळ पुणे येथे सदिच्छा भेट. संस्थेच्या सामाजिक कार्याचे केले कौतुक

हडपसर/पुणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचलित साने गुरुजी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवेबाबत ऐकले असल्याने केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपद नाईक यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी रुग्णालयास सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी मंडळाचे सचिव अनिल गुजर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महाराष्ट्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याने साने गुरुजी आरोग्य केंद्रात मंत्र्यांनी नवजात बालकास पोलिओ डोस पाजला.
अनिल गुजर यांनी साने गुरुजी आरोग्य केंद्राच्या विविध बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागासह सुसज्ज असे स्त्री रोग – प्रसुती तंत्र विभाग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, शस्त्रकर्म विभाग दाखविले.
रूग्णालयाच्या सभागृहात श्री. गुजर यांनी संस्थेद्वारा चालविले जाणारे विविध प्रकल्प डिंभा व नारोडी येथिल मुक्तांगण, आदिवासी लोकांसाठी सिकल सेल प्रकल्प, विविध शाळा व आयुर्वेद महाविद्यालय याबाबत माहिती दिली.
साने गुरुजी रूग्णालयाद्वारा समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. यात मोफत कृत्रिम हात (LNG) व जयपूर फूट मंडळाद्वारे बसविले जातात. तिरळेपणा शस्त्रकर्म, कर्ण बाधिर रूग्णांना श्रवणयंत्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानद्वारा मोतिबिंदू शस्त्रक्रिया इत्यादी सुविधा मोफत देण्यात येतात.
सिकल सेल रुग्णांसाठी तयार केलेले व CCRAS द्वारा प्रमाणित औषध Tab.SC3 बाबत माहिती दिली. या सोबत सिकल सेल विभागाचे प्रमुख डॉ.सुदाम काटे यांना भारत सरकारने दिलेल्या पद्मश्री पुरस्कारा बाबत माहिती दिली.
या प्रसंगी डॉ.जयश्री टोणगांवकर, डॉ.सिमा कालिया, डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ. कल्पना आयरे, डॉ. योगेश नारखेडे, डॉ. जगताप, पदव्युत्तर विद्यार्थी, मंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंडळास मंज़ूर CENTRE FOR EXCELLENCE FOR WOMEN and CHILD project ची माहिती दिली. तसेच याचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली.
या भेटीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्रीपद नाईक यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळ व साने गुरुजी आरोग्य केंद्राच्या कामाबाबत विशेष कौतुक केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Tһanks for the auspicious writeup. It in truth used to
be a leіsure acc᧐unt it. Glance complicɑted to morte ɑdded agreeable from you!
By the way, how could we be іn contact? http://dongliwu.cn/comment/html/?84947.html

1 year ago

Hi, every timе i used to check webpage posts here early in the dawn, since
i loνe to find out mlre and more. https://Wikisenior.es/index.php?title=35_Gorgeous_Wedding_Visitor_Hairstyle_Concepts_2022

2 months ago

O que devo fazer se tiver dúvidas sobre meu parceiro, como monitorar o telefone celular do parceiro? Com a popularidade dos telefones inteligentes, agora existem maneiras mais convenientes. Por meio do software de monitoramento do telefone móvel, você pode tirar fotos remotamente, monitorar, gravar, fazer capturas de tela em tempo real, voz em tempo real e visualizar telas do telefone móvel.

2 months ago

Você também pode personalizar o monitoramento de determinados aplicativos, e ele começará imediatamente a capturar instantâneos da tela do telefone periodicamente.

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x