पुणे

वसंत मोरे यांचा आमदार टिळेकरांना इशारा तर सेनेला चिमटा, तुम्ही चौकीदार असाल हडपसर मतदारसंघात आम्ही पहारेकरी ! बोगसपणा दिसला की मारणार !

हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
आमदार योगेश टिळेकर यांची महाराष्ट्र भाजप नवमतदार नोंदणी प्रमुखपदी नुकतीच निवड झाली, या नियुक्तीवरून मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत आमदार योगेश टिळेकर यांना इशारा देत शिवसेनेलाही चिमटा काढला आहे, मागील मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 41 मध्ये बोगस मतदारांच्या 6 क्रूझर गाड्या पकडण्यात आल्या होत्या, यावेळी या बोगस मतदारांना चोपही देण्यात आला होता. आमदार टिळेकर यांनी सोलापूर जिल्ह्यातून बोगस मतदार आणल्याचा आरोप त्यावेळी सर्वपक्षीय विरोधकांनी केला होता. या बोगस मतदारांच्या नोंदणीविरोधात सेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी आंदोलन केले होते याची आठवण मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये करून दिली आहे…
पहा त्यांची पोस्ट…

….. कालच वाचण्यात आलय की हडपसरच्या स्वयंम घोषित नामदाराची महाराष्ट्र राज्य भाजपा नवमतदार नोंदणी प्रमुख म्हणून निवड केली आहे अजून ही 2017 च्या त्यांनी मित्र पक्षाला दिलेल्या जखमा ताज्या असताना आता काय करणार,बोगस म्हणून घसा कोरडा होइपर्यंत ओरडले ना मग आता पहारा देणार की स्वताच्या फायद्यासाठी मूग गिळून गप्प बसणार ! पण दोघांनीही लक्षात ठेवा समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे आणि मी वसंत (तात्या) मोरे आणि माझा साथीदार साईनाथ बाबर डोळ्यात तेल घालून (तुम्ही चौकीदार असताना) आम्ही पहारा देणार तर मग लक्षात ठेवा तो वळणावरचा बोर्ड “नजर हटी तो दुर्घटना घटी” कारण आम्ही नुसती निवेदन देत नाय तर बोगसपणा दिसला की लय मारतो राव !

एकीकडे लोकसभा निवडणूक जाहीर झालेली असताना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातील या संभाव्य मल्लांचे डावपेच आतापासूनच सुरू झाले आहेत. राज्यात युती झाली असताना हडपसर मतदारसंघात मात्र युतीचा उमेदवार राहणार की स्वतंत्र लढणार हा कुतूहलाचा विषय झाला आहे, विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना डावलून सेनेचे महादेव बाबर यांना उमेदवारी मिळेल का हा चर्चेचा विषय बनला आहे, दुसरीकडे मनसे राष्ट्रवादीला लोकसभेला पाठिंबा देणार असल्याचे चित्र असताना जर त्यांची छुपी आघाडी विधानसभेलाही टिकली तर हडपसर मतदारसंघ वसंत मोरे यांच्या करिता राज ठाकरे मागतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, या पार्श्वभूमीवर वसंत मोरे दिवसेंदिवस आक्रमक पवित्रा घेत जाणार असे वातावरण दिसू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेचे इच्छूक उमेदवार आपली पोळी भाजून घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Comment here