पुणे

शिवसेनेची लोकसभेची राज्यातील पहिली यादी जाहीर शिरूरमधून “आढळराव पाटील” व मावळमधून “श्रीरंग बारणे”

मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज)
राज्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र, शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नव्हती. अखेर आज (शुक्रवार) शिवसेनेने २१ उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. काही मतदार संघ सोडले तर आता सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहिर केले आहेत. आता खर्‍या अर्थाने राजकीय धुळवडीला सुरवात झाली आहे.

शिरूरमधून अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तर मावळ मधून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे, या दोन्ही मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्टेची केल्याने येथील लढत लक्षवेधी होणार आहे.

उमेदवारांची नावे आणि मतदार संघाचे नाव पुढील प्रमाणे :

दक्षिण मुंबई – अरविंद सावंत

उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर

ठाणे – राजन विचारे

कल्याण – श्रीकांत शिंदे

रायगड – अनंत गिते

कोल्हापूर – संजय मंडलिक

हातकणंगले – धैर्यशिल माने

नाशिक – हेमंत गोडसे

शिर्डी – सदाशिव लोखंडे

शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील

औरंगाबाद – चंद्रकांत खैरे

यवतमाळ-वाशिम – भावना गवळी

बुलढाणा – प्रतापराव जाधव

रामटेक – कृपाल तुमाणे

अमरावती- आनंदराव अडसूळ

परभणी- संजय जाधव

मावळ – श्रीरंग बारणे

उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर

हिंगोली – हेमंत पाटील

दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे

रत्नागिरी सिंधुदुर्ग : विनायक राऊत

Comment here