पुणे

नारायणपूर येथे सपासप वर व गोळ्या घालून सराईताचा खून पुणे जिल्ह्यातील नारायणपूर येथील घटना

पुणे : रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन – 
पुण्यातील एका सराईत गुन्हेगारावर हल्ला चढवत अज्ञातांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून पुणे सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भररस्त्यात त्याचा खून केला. गुरुवारी दुपारी ही घटना नारायणपूर येथे घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हसन शेख असे खून झालेल्याचे नाव आहे.

हसन शेख हा पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आज सकाळी हसन शेख हा नारायणपुर येथून त्याच्या कारने जात होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांच्या एका बोलेरोने त्याच्या कारला धडक दिली. त्यानंतर त्याच्यावर गोळीबार केला. २ गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला गाडीतून बाहेर काढून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार खून केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

२०१५ मध्ये त्याच्यावर हॉटेल राज गार्डनर येथे त्याच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तो काही काळ कोमात होता. त्यानंतर त्यातून सावरल्यानंतर त्याने आता हॉटेल आणि इतर व्यवसाय सुरु केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली होती. त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचा संशय होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा त्याच्यावर अशाच प्रकारे हल्ला करून खून करण्यात आला.

Comment here