पुणे

पुणे तेथे काय उणे ! दाम्पत्याने राबवली महिलांसाठी योजना,ती स्वच्छतागृह 13 ठिकाणी सुरू…!

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन )-
पुण्यात गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. ज्या ठिकाणी स्वच्छतागहृे आहेत, अशा ठिकाणी स्वच्छता नसते. त्यामुळे महिलांना नाहक त्रास होतो. यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होता. ही समस्या लक्षात घेऊन पुण्यातील एका दांपत्याने हटके प्रयोग केला. यासाठी पुणे महापालिकेच्या मदतीने त्यांनी भंगार झालेल्या बसेसमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे सुरू केली. या बसेसना त्यांनी “ती स्वास्थ्य’ असे नाव दिले आहे. सध्या शहरात अशा १३ बसेस तयार करण्यात आल्या आहेत. केवळ पाच रुपयांत महिलांना बसेसमध्ये सुविधा मिळते. विशेष म्हणजे या बसेसमध्ये लहान मुलांना स्तनपान करण्याचीही सोय आहे. तसेच मुलाचे डायपरही बदलता येतात.
२०१६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करण्याची याेजना आखली. त्यांनी उद्योजक उल्का सादळकर आणि राजीव खैर यांना याबाबत माहिती दिली. या दाेघांच्या कंपनीचे पुण्यात मोठे नाव आहे. या दाेघांनी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कुणाल कुमार यांनी त्यांच्यासाेबत चर्चा केल्यानंतर या याेजनेची कल्पना सुचली. अमेरिकेत बेघर नागरिक जुन्या बसेसमध्ये राहतात. यातून आम्हाला ही कल्पना सुचली. पुण्यात दरराेज २०० महिला या स्वच्छतागृहांचा लाभ घेतात. बसेसमध्ये महिला कर्मचारी आहेत.

दहा वर्षांपर्यंत या बसेस कार्यरत राहतील
पुणे महानगरपालिकेचे सह-आयुक्त ज्ञानेश्वर मोलक म्हणाले, जुन्या बस कंपनीकडे देण्यात येतात. बसेस बदलण्यासाठी १० लाख रु. खर्च होतात. या बसेस १० वर्षांपर्यंत कार्यरत राहतील.
स्वच्छतेची माहिती देणारे स्क्रीनही लावले
सेन्सरचे नळ
आरसा
डायपर बदलण्यासाठी जागा
सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन
लहान मुलांसाठी दूध पाजण्याची जागा
स्वच्छतेची माहिती देणारे एलईडी स्क्रीन
कॅफेसाेबत फळ विक्री केंद्र
सोलारवर चालतात लाइट, उपकरण
उल्का म्हणाल्या, या बसमध्ये लाइट आणि इतर उपकरणे सोलारवर पॅनलवर चालतात. यासाठी खर्चही कमी लागतो. बसमध्ये तंत्रज्ञदेखील आहेत. साेलार किंवा बिघाड झाल्यास ते दुरुस्त करतात,हा अभिनव उपयुक्त उपक्रम राबवल्याबद्दल या दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x