पुणे

महानगरपालिकेच्याआरोग्य निरीक्षकाचा प्रताप कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच : लागला एसीबीच्या गळाला

महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज –
कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारकडे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एका आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश मोहन तेलकर (वय ५३, आरोग्य निरीक्षक, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका) असे अटक केलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत संबंधित तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांचे सर्व्हे नंबर ३४/३/४, आंबेगाव पठार येथे दोन दुकानगाळे भाड्याने घेतले आहेत. या दुकानगाळ्यांसाठी ड्रेनेज लाईन नाही तसेच कमर्शिअल लाईट मीटर नाही. त्यामुळे या कारणावरून तक्रारदार यांच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर याने सुमारे पाच हजाराची लाच मागितली.

यावेळी तक्रारदार याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार या विभागाने २८ जानेवारी २०१९ रोजी पडताळणी केली असता आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर याने कारवाई टाळण्यासाठी सुमारे पाच हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर याच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिला आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
5 months ago

Fantastic goods from you, man. I have understand your stuff previous to and you are just extremely fantastic.
I really like what you’ve acquired here, certainly like what
you’re saying and the way in which you say it.

You make it enjoyable and you still take care of to keep it wise.

I can not wait to read far more from you. This is really a great website.

5 months ago

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x