पुणे

हडपसरमधून कोल्हेना लीड न दिल्याबद्दल विधानसभेच्या उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांना जयंत पाटलांनी विचारला जाब…! काय झाले निसर्गवर ? पहा रोखठोक रिपोर्ट…!

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निसर्ग गार्डन मार्केट यार्ड येथे आज पार पडल्या,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी हडपसर मतदारसंघातुन विधांनसभेकरिता इच्छुक असलेल्या आजी माजी महापौर,नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.डॉ अमोल कोल्हे यांच्यासारखा चांगला उमेदवार दिला असताना माजी खासदार आढळराव पाटील यांना 5 हजाराहून अधिक मताधिक्य कसे काय मिळाले असा खडा सवाल करत त्यांनी इच्छुकांना निरुत्तर केले.
निसर्ग गार्डन येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्या,यावेळी खासदार वंदना चव्हाण,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,आमदार विद्या चव्हाण आदी पक्षाचे नेते उपस्थित होते.
हडपसरमधून शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेवक फारूक इनामदार, नगरसेविका नंदा लोणकर, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे,बाळासाहेब जाधव, अशोक कांबळे, डॉ. लाला गायकवाड आदींनी मुलाखती दिल्या.
डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयाकरिता चांगले काम केल्याचा दावा सर्वांनी केला तर काहींनी पक्षकरीता दिलेल्या योगदानाचा पाढा वाचला,महिला इच्छुकांनी महिलांना संधी देण्याचे पवार साहेबांचे धोरण असून उमेदवारीची मागणी केली,यावेळी जयंत पाटील यांनी बाजूच्या रूममध्ये जाऊन सर्वानी एकमत करून उमेदवारीसाठी एक नाव सुचवा असा पर्याय ठेवला असता इच्छुकांनी तुम्ही द्याल तो उमेदवार निवडणुन आणण्याकरिता जीवाचे रान करू असे सांगितले. नगरसेवक योगेश ससाणे यांचा सविस्तर असा बायोडाटा पाहताना आंदोलनाचे फोटो पाहून त्यांनी सांगली महानगरपालिकेतही योगेश नावाच्या नगरसेवकास आंदोलन करण्याची सवय असल्याचे मिश्किलपणे सांगितले.
नगरसेवक फारूक इनामदार यांनी अल्पसंख्यांक समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी सातत्यानं असून उमेदवारीच्या रूपाने संधी दिल्यास पुणे शहर व जिल्ह्यात चांगला संदेश जाईल असे सांगितले.
शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी यावेळी सांगितले की राष्ट्रवादीची ताकद हडपसर मतदारसंघात सर्वात जास्त असून सर्वांनी एकोप्याने काम केल्यास आमदार होण्यास काहीच अडचण येणार नाही,यावर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून योग्य उमेदवार कोण याचा सर्वे सुरू असून पक्ष योग्य तो निर्णय घेईल तरी कोल्हे यांच्याकरिता मताधिक्य देता आले नाहीं याचा विचार करून सरवांनी कामाला लागावे या शब्दांत उपदेशाचे डोस इच्छुकांना पाजले.

योगेश ससाणे यांना सांगलीचे निमंत्रण..…..
नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिकेत वेगवेगळी आंदोलने करून प्रशासन व नेत्यांचे लक्ष वेधले, राष्ट्रवादीच्या आमदारकीची मुलाखत सुरू असताना जयंत पाटील यांनी ससाणे यांच्या आंदोलनाचे कौतुक केले तसेच तुम्ही महापालिकेत चांगले काम करीत आहात की असे म्हटल्यावर हजरजबाबी नगरसेवक ससाणे यांनी आमदार म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली यावर आमच्या सांगली महापालिकेत एक योगेश आहे तोही आंदोलने करतो नगरसेवक ससाणे यांना मोबाइल नंबर देऊन नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीचे निमंत्रण दिले. मुलाखत विधानसभेसाठी असली तरी चर्चा मात्र योगेश ससाणे यांच्या मनपा आंदोलनाची रंगली होती.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

I think what you wrote was actually very reasonable. However, what about this?

what if you added a little content? I ain’t saying your information is not solid.,
however suppose you added a post title that grabbed folk’s attention? I
mean हडपसरमधून कोल्हेना लीड
न दिल्याबद्दल विधानसभेच्या उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांना जयंत पाटलांनी विचारला जाब…!

काय झाले निसर्गवर ? पहा रोखठोक रिपोर्ट…!

– Rokhthok Maharashtra News is kinda boring. You should look at Yahoo’s front page and see how they
create post titles to grab viewers to open the links. You might add
a video or a picture or two to get readers interested
about what you’ve got to say. Just my opinion, it could bring your
posts a little bit more interesting.

2 months ago

Care sunt avantajele mutării primăriei în centrul comunei?
Visit us telkom university

2 months ago

Au fost identificate locații potentiale pentru noul sediu al primăriei?
Visit us telkom university

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x