पुणे

नागरिकांच्या समस्या आता सोशल मीडियातून मार्गी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांचा उपक्रम नागरिकांचा प्रतिसाद, लोकांचे प्रश्न मार्गी

हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन)
सध्या सोशल मीडियाचा जमाना असताना याचा काही लोक गैरवापर करतात तर काही लोक चांगल्या कामासाठी वापर करताना दिसतात नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप केला असून नागरिकांनी यामध्ये तक्रारी मांडण्याचा सपाटा लावला आहे तसेच नगरसेवकांच्या कार्यकर्त्याकडून या तक्रारींचे निराकरण करून जागेवरच प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याने खऱ्या अर्थाने नगरसेवक भानगिरे यांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केल्याची चर्चा हडपसरमध्ये होत आहे.
सध्या सोशल मीडिया मध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेले आहे, साधारण कार्यकर्त्यांबरोबर राजकीय नेते सोसहल मीडियावर आघाडीवर असतात. लहान मुले, युवक एवढेच काय ज्येष्ठ नागरिक काही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असताना दिसतात. सोशल मिडीयाचा वाढता वापर जसा डोकेदुखी बनला आहे तसाच या सोशल मीडियाचा वापर चांगले सकारात्मक कामासाठी करता येतो याचे जिवंत उदाहरण प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी मांडले आहे.
प्रभागांमध्ये सोसायट्या, बैठी घरे, झोपडपट्ट्या व विविध प्रकारचे लोक राहतात प्रत्येक नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी नगरसेवकांच्या कार्यालयात जायला जमतेच असे नाही मतदार व नागरिकांची अडचण लक्षात घेता नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रभाग क्रमांक 26 चा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे या व्हाट्सअप ग्रुप वर नागरिकांना सहभागी करून घेतले जात आहे. नागरिक या ग्रुप वर आपल्या तक्रारी व परिसरातील प्रश्न मांडतात नगरसेवकांचे कार्यकर्ते या ग्रुपवर चांगल्याप्रकारे सक्रिय असतात त्यांच्या तक्रारींना तातडीने उत्तर दिले जाऊन महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तेथील प्रश्न सोडविण्याबाबत पुढाकार घेतला जातो काही प्रश्न तातडीने सोडविले जातात तर काही प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा, निधीची तरतूद केली जात आहे. नगरसेवक भानगिरे यांच्या या उपक्रमाचे हडपसर मध्ये कौतुक होत आहे. ड्रेनेज, रस्ता, कचरा, पाणी, सुरक्षा व मूलभूत प्रश्न मांडले जात आहेत.
मतदारांनी व नागरिकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनी आमच्या कार्यालयात आले पाहिजे असे काही नाही त्यांनी मोबाईलवर किंवा व्हाट्सअप ग्रुप वर जरी तक्रारी मांडल्या तरी ते सोडवणे आमचे कर्तव्य समजतो, काही प्रश्न तातडीने सोडवले जात आहेत तर गंभीर व मोठे प्रश्‍न सोडवण्यास संदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा करून मोठ्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे सोशल मीडियाचा वापर खऱ्याअर्थाने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला जात आहे.
प्रमोद नाना भानगिरे
नगरसेवक
पुणे मनपा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x