पुणे

प्लास्टिक ची अंडी बाजारात ही नुसती अफवा ‘नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी’ चा खुलासा


बाजारात विकली जाणारी अंडी प्लास्टिकची असल्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण हा केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेला अपप्रचार आहे. कुठलीच अंडी प्लास्टिकची असू शकत नाहीत, असा खुलासा ‘नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी’ने खास डेमोच्या माध्यमातून केला आहे.

कुठलंही अंड फोडलं की, त्याच्या आत कवचाला चिकटलेला एक पापुद्रा असतो. हा पापुद्रा अगदी अलगदपणे कवचापासून वेगळा करता येतो. अंड शिळं असल्यास हाच पापुद्रा प्लास्टिक सारखा भासतो, आणि ते अंड आपल्याला प्लास्टिकचं असल्याचं वाटतं. प्रत्यक्षात ते खोटं आहे हे पटवून देण्यासाठी एक चाचणी आहे.

अंड्याचा हा पापुद्रा आगीवर पकडला तरी तो सहजासहजी जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेतं. त्यामुळे प्लास्टिक अंड ही केवळ अफवा आहे. अंड्यांबाबत पसरत असलेल्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा खुलासा केला.

प्लास्टिक अंड्यांच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तसेच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मुंबई तसेच ठाणे विभागात प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी ‘नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी’ने पुढाकार घेतला आहे.

अंड्यांबाबत निर्माण झालेल्या गैरसमजातून लोक अंडी खाण्याचे टाळतात. परिणामस्वरुप अंड्यांची मागणीदेखील घटली आहे. अन्न घटकांची पूर्तता तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून ही बाब बाधक आहे. त्यामुळे अंडी खाणाऱ्यांनी संडे हो या मंडे असं म्हणत अंडी बिनधास्त खावीत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
8 months ago

Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you relied on the video to make your point.
You clearly know what youre talking about, why waste your intelligence on just posting videos to your site when you could
be giving us something informative to read?

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x