पुणे

गाडीला कट मारल्याचे किरकोळ कारण धारधार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी हडपसर पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

पुणे : (प्रतिनिधी)
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरुन गंभीर जखमी करणा-या आरोपीच्या हडपसर पोलीसांनी ४८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत दि. २ फेब्रुवारी रोजी पहाटे १:३० ते २:०० वाजेच्या सुमारास मुंढवा चौकात गाडीला कट मारला या कारणावरुन, अक्षय ज्ञानेश्वर जाधव वय २४ वर्षे रा. कासरीवाल पुष्प नागेश्वर वाडी, औरंगाबाद, व सतिश सुधाकर वानखेडे, यांचा आरोपींनी चार चाकी वाहनाने पाठलाग करुन त्यांना हॉटेल कल्ट जवळ अडवुन गाडीतील चार अनोळखी इसमांनी सतिश वानखेडे यांना धारदार शस्त्राने खांद्यावर, पाठीवर व डोळ्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. सदर प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, व त्यांचे सहकाऱ्यांनी काहीही पुरावा अथवा माहिती नसतांना यातील जखमी इसम सतिश सुधाकर वानखेडे, यांचेकडील आरोपीचे वर्णन व घटनाक्रम व गाडीवर असलेला महाराष्ट्राचे नकाशाचा लोगो असल्याची माहीती करुन घेतली आणि पुढील तपास सुरु केला. सदर घटनेचा तपास करीत असतांना हडपसर, मुंढवा हद्दीमध्ये पोलीस शिपाई कुसाळकर, पोलीस शिपाई. चित्ते, पोलीस शिपाई विजय पवार यांनी सुमारे ३२ कॅमेरे चेक करुन सदर आरोपींनी वापरलेली कार एक संशयीत वाहन शोधण्यात यश आले. सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन जलदगतीने तपास करुन तात्काळ गाडीची आरटीओ व इतर ठिकाणाहुन माहीती प्राप्त करुन आरोपीतांना मुंबई व पुणे या ठिकाणी जावून सखोल तपास करुन सदर गुन्हयातील एकुण तीन आरोपी योगेश चंद्रकांत हनमणे वय – २४ रा. सोलापुर, रितेश अंबादास जाधव वय – २१ रा. केशवनगर मुंढवा, अविनाश सुनिल गायकवाड वय – २२ रा. केशवनगर मुंढवा, व गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेतली आहे. यामधील एक आरोपी फरार आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, व पोलीस उपायुक्त सुहास बावचे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर, यांचे सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार रमेश साबळे, पोशि अनिल कुसाळकर, पोशि अमित कांबळे, पोशि विजय पवार, पोशि ज्ञानेश्वर चित्ते, पोशि प्रशांत नरसाळे यांनी केली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x