पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश… वर्दीतील देवमाणूस आला धावून.. पोलीस अधिकाऱ्याचा शोषितांना मदतीचा हात ; महाराष्ट्रातसह अनेक राज्यात घरगुती साहित्य वाटप

पुणे: अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुराव दादाराव चव्हाण यांच्या सौजन्याने व महासंघाचे मार्गदर्शक, आधारस्तंभ  सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशात हातावर पोट असलेले व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप घरपोच करण्यात आले. 

त्यामध्ये ओरिसा, कर्नाटक, गोवा, गुजरात ( गोद्रा ), आसाम ,नागालँड,नवी मुंबई ,मुंबई ,ठाणे ,कल्याण, बदलापूर, हडपसर, वैदूवाडी, यवत,खडकी, भिगवण, पाटस,डिकसळ,वरवंड,फलटण, वीर,पिरंगुट, देहू, बाणेर, चाकण, इंदुरी नाका, तळेगाव दाभाडे  विविध भागांमध्ये सहाशे कुटुंबांना अन्नधान्य घरपोच करण्यात आले. भारत देशात समाजबांधव पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरत असतात. 25 मार्च ला अचानक संपूर्ण राज्यात लॉक डाऊन चा आदेश काढल्यामुळे ज्या ठिकाणी राज्यात जिल्हयात शहरात, खेड्यात, वाड्या-वस्त्यांवर समाज बांधव मुक्कामी होते या ठिकाणाहून त्यांना स्वतःच्या गावी येण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वाहन मिळत नसल्याने, त्या ठिकाणीच अडकून राहावे लागले. भटका समाज असल्यामुळे  यांचे हातावरचे पोट, उदरनिर्वाह साठी कुठल्याच प्रकारचे साधन मिळू शकले नाही, त्यांच्यावर उपासमारी ची वेळ आली असताना प्रवासा दरम्यान ज्या काही अडचणी आल्या त्या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, यांना समाजातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय खात्यातील बांधवां मार्फत फोनच्या माध्यमातून संपर्क करून तेथे जागेवरच निवाऱ्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करून देण्यात आली.
कोरोना व्हायरस आताच झालेल्या कलावंतांवर उपासमारी ची वेळ आली होती. जीवनावश्यक  वस्तूंचे, अन्नधान्याचे वाटप घरपोच करत असताना कार्यकर्त्यांनी समाज बांधवांना कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जग संकटात आहे त्यामुळे घरातून बाहेर जाऊ नका, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कोणालाही त्रास होत असेल, लक्षणे जाणवत असतील तर त्वरित खासगी किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या असे विविध जनजागृतीचे संदेश घरोघरी बांधवा पर्यंत पोहचवत आहेत.
त्यामुळे महासंघाचे अनमोल कामाचे व मदतीचे देशभरातून मोठे कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी सर्वात जास्त मेहनत व योगदान, संपूर्ण नियोजन महासंघाचे पदाधिकारी भरतकुमार तांबिले, गोरख इंगोले, प्रा. सुभाष भोसले, विजय जाधव, मोहन शिंदे, सागर चव्हाण, अनिल चव्हाण, सहदेव सावंत, दिनेश शिंदे, शरद जगताप, अनिल चौगुले, अंभरनाथ इंगोले, अविनाश पवार करीत  आहेत.

फोटो काढण्याचे टाळले अन माणुसकी जपली
सध्या कोथरूड येथे सहायक आयुक्त असलेले मच्छिंद्र चव्हाण यांनी हजारो कुटूंबाना मदतीचा हात दिला असताना, घेणारा परिस्थिती ने गाजला आहे पण तो माणूस आहे त्यामुळे फोटो काढून प्रदर्शन करण्यापेक्षा भुकेल्याच्या मुखात दोन घास जावेत हा हेतू ठेवला, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या फोटो काढू नका अन सोशल मीडियावर टाकू नका, मदत केली अन माणुसकी देखील जपली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x