पुणे

Pune : विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यास तिघांनी मिळून चोपलं

पुणे :  – विनामास्क कारवाई करत असताना रागातून तिघांनी पोलिस शिपायाला मारहाण केल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी नानापेठेत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रितेश नंदकुमार कासट (वय ४३) व कृष्णा मल्लप्पा अंतरगंगी (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याचा साथीदार अक्षय सुरेश बेगरुट (वय २७ सर्व रा. नाना पेठ) फरार आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय भोसले यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेया माहितीनुसार, कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यता आले आहे. त्यापाश्र्वभूमीवर काल संध्याकाळी विजय नाना पेठेतील पालखी विठोबा चौकाजवळ पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रितेश हा येथील मयंक एन्टरप्रायजेस दुकानाच्या काउंटरवर विनामास्क बसला होता. त्यामुळे विजय यांनी त्याच्याविरुद्ध विनामास्कची कारवाई केली. कारवाई करत असताना कृष्णा व अक्षय याने विजयला पकडून हाताने मारहाण केली. त्यांच्या गणवेशाची नेमप्लेट तोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अधिक तपास समर्थ पोलिस करत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x