पुणे

लक्षणे जाणवल्यास पालिकेच्या रुग्णालयात तपासणी करावी – आमदार चेतन तुपे

हडपसर (28) रयत सेवकांमध्ये covid-19 बाबत जागृती हवी .थंडी, ताप ,अंगदुखी ही लक्षणे दिसताच महानगर पालिकेच्या सेंटरवर तपासणी करून घेण्याचे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन (दादा)तुपे यांनी एस .एम. जोशी कॉलेज हडपसर येथे आयोजित रयत covid-19 मदत केंद्र आढावा बैठकीत मार्गदर्शन केले .स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. पुढे आमदार चेतन (दादा)तुपे म्हणाले की, सर्व रयत सेवकांसाठी व त्यांच्या कुटूंबियांसाठी हे सुविधा केंद्र आहे. रक्तदाब आणि शुगरच्या पेशंटने वेळेवर तपासणी करून गोळ्या वेळच्या वेळी घेतल्या पाहिजेत. भविष्यात पोस्ट कोविडसाठी काम करावे लागेल. लोकांनी जीवनशैली बदलायला हवी. व्यायाम केला पाहिजे. पोष्टीक आहार घेतला पाहिजे. या आढावा बैठकीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ निमंत्रित व्यक्ती म्हणून डॉ.शंतनू जगदाळे ,शासकीय आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल काळे,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी रयत संकुलातील सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते. विजय शितोळे, सुजाता कालेकर ,विठ्ठल पवार, तमन्ना शेख ,उषा माने, आदी शाखाप्रमुख व लालासाहेब खलाटे, व्हाईस चेअरमन रयत सेवक को-ऑपरेटिव बँक लिमिटेड सातारा ,दत्ता भाऊ तुपे सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.समन्वयक म्हणून डॉ. अशोक पांढरबळे काम पाहत आहेत. आभार उपप्राचार्य, डॉ. महादेव जरे यांनी मानले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x