पुणे

एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे शेतीच्या कामासाठी मजूरांची टंचाई 

फेब्रुवारी 2020 मधे भारतातील बेरोजगारी रेकाॕर्ड ब्रेक वाढली होती. त्यानंतर लाॕकडाऊनमधे हजारोंच्या संख्येने लोक बेरोजगार झाले. त्याची चर्चा सगळीकडे सुरु असताना शेतीतील कामासाठी जून-जुलै मधे आणि आजही मजूर मिळत नाहीत अशी तक्रार, चर्चा ठिकठिकाणाहून ऐकायला आणि वाचायला मिळतेय. याची कारणे काय असावीत?
मला वाटते :
1) आपल्या आजूबाजूला कुठलेही शारीरिक श्रम न करता बऱ्यापैकी पैसे मिळवणारा एक वर्ग दिसत असल्याने थोड थांबून का होईना आणि आडमार्गाने का होईना पण कमी कष्टात नियमित उत्पन्न मिळवणाऱ्या गटात सामील होण्याच स्वप्न पाहिल जात असणार.
2) थोड्याफार झालेल्या शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणून शेतीतील कष्टाची कामे करण्याची मानसिकता राहिली नसणार.
3) शेतमजूर म्हणून करावे लागणारे कष्ट आणि त्या बदल्यात मिळणारा मोबदला याचे व्यस्त प्रमाण याच गणित मांडल जावून त्यापेक्षा स्वस्थ बसण परवडत असणार. भविष्याबद्दलची कुठलीही सुरक्षितता किंवा कामातला आनंद तिथे सापडत नसणं. (अर्थात वेगवेगळ्या भागात जी काही वेगवेगळी मजूरी आहे ती देणही शेतकऱ्यांना आज परवडत नाही, याची दखल इथे घ्यावी लागेल.
4) ज्यांनी शारीरिक कष्ट करणे अपेक्षित आहे अशा शेतकरी आणि शेतमजूर वर्गाचा आहार पोषणमूल्यांच्या दृष्टीने निकृष्ट आहे. भारताच्या वातावरणातील वाढतं तापमान आणि अपूरं पोषण या स्थितीत शारीरिक कष्ट करण्याची क्षमता कमी होण आणि त्यामुळे इच्छा कमी होण स्वाभाविक आहे.
5) फार मोठ्या संख्येने काम नसलेल्या पुरुषांसमोर उद्या काय खायच? हा प्रश्न भेडसावत नसणार कारण घरातील महिला म्हणजे आई किंवा बायको मिळेल ते काम करुन, कोंड्याचा मांडा करत कुटुंबातील सगळ्यांच्या दोन वेळच्या अन्नाची सोय करत असणार. (याचा अर्थ सर्वच पुरुष घरात बसून असतात असा या मुद्द्याचा अर्थ कृपया काढू नये. अनेक घरातले बाप, मोठे भाऊ हे राबत असतातच. प्रमाणाच्या संदर्भात मुद्दा समजून घ्यावा)

यापेक्षा आणखी काय वेगळे मुद्दे असतील अस तुम्हाला वाटत???
– सुभाष वारे

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
8 days ago

Good info. Lucky me I reach on your website by accident, I bookmarked it. Seo Hizmeti Skype : live:by_umut

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x