पुणे

लसीवर आरोप करणाऱ्या ‘त्या’ स्वयंसेवकावर सीरमचा १०० कोटींचा मानहानीचा दावा

नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मेंदुशी संबंधित त्रास झाल्याचा दावा एका स्वयंसेवकाने केला होता. यासाठी कंपनीने पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटने आता नोटीस काढत स्पष्टीकरण दिले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने नोटिसीमध्ये म्हंटले कि, रुग्णाला आमची सहानुभूती आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या चाचणी आणि त्याची सध्या बिघडलेली प्रकृती याचा काहीही संबंध नाही. त्याच्या या प्रकृतीला विनाकारण तो सीरम संस्थेला दोषी धरत असून चुकीचे आणि गंभीर आरोप केले आहेत. त्याविरोधात या व्यक्तीवर कंपनीकडून १०० कोटींचा मानहानीचा दावा कऱण्यात आला आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटची लस घेतल्यानंतर मेंदुशी संबंधित त्रास झाल्याने लस घेतलेल्या एका स्वयंसेवकाने पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली. यासंबंधी त्यांचे वकील एनजीआर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.

आपल्या आशिलाला लसीच्या चाचणीचा डोस दिल्यानंतर त्यांच्यात मेंदुविकाराशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी सीरम इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, ऍस्ट्राझेन्का, ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया, या लसीच्या संशोधन विभागाचे प्रमुख ऍन्ड्य्रू पोलार्ड यांना आम्ही नोटीस बजावली असल्याचे प्रसाद यांनी सागितले. ही नोटीस आम्ही 21 नोव्हेंबरला बजावली आहे.

याबाबत सीरम इन्सिट्टयूटशी संपर्क साधला असता, या स्वयंसेवकाला नेमका कशामुळे मेंदुविकाराचा त्रास झाला याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ती तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत अधिक भाष्य करता येईल,असे त्या संस्थेच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

Comment here