पुणे

धक्कादायक वृत्त : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू

पुणे :  – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या मध्ये 5 पुरुषांंचा  समावेश असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यांना हडपसर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला आहे.

सिरममध्ये आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समजताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे मनपाच्या अग्नीशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच 100 जवान घटनास्थळी दाखल झाले होते. सिरमच्या नवीन इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर आग लागली होती. तेथून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, आताच मिळालेल्या माहितीनुसार 5 व्या मजल्यावर असलेल्या 5 जणांचा आगीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 4 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचं विश्वसनीय सुत्रांनी सांगितलं आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x