पुणे

” कोंढवा रस्त्याच्या कामावरून विद्यमान व माजी आमदार आमनेसामने” ‘आम्ही केलेल्या कामाचे श्रेयासाठी टिळेकरांची धडपड’ – चेतन तुपे समर्थक ‘दिड वर्षात मंजूर केलेले नवीन काम दाखवा’ – योगेश टिळेकर

हडपसर (प्रतिनिधी)
कोंढवा मधील रस्त्याच्या व ड्रेनेजच्या कामाच्या माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्या बॅनरबाजी व सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत, आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची धडपड माजी आमदार करत असलयाचा आरोप आमदार समर्थक करत आहेत तर मी केलेल्या मंजूर कामाशिवाय दीड वर्षात केलेले नवीन काम जनतेला दाखवा अशा शब्दांत माजी आमदारांनी टिका की आहे. यावरून विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये “श्रेयाचे राजकारण” रंगलेले दिसत आहे.


कोंढवा येथे प्रभाग क्रमांक 41 येथे रस्त्याचा कामाचा शुभारंभ विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विकासनिधीतून झाला, तेथेच माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नगरसेवकांच्या निधीतून ड्रेनेज व रस्त्याचे काम सुरू असल्याचा फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सवरून महाविकासाघाडी या फेसबुक पेजवर पोस्ट टाकून आमदारांच्या समर्थकांनी निषेध व्यक्त केला आहे.
मा.आमदार योगेश टिळेकर साहेब आपली श्रेय लाटण्याची आणि खोट बोलण्याची सवय कधी संपणार हे देव जाणे पण जे काम आपण केलेच नाही त्याचे बॅनर तरी का लावावे? का तर अवघ्या काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणूका आलेल्या आहेत अस असेल तर आपण गेली पाच वर्षे काम केले असते आपल्या मतदारसंघात गल्लोगल्ली कचऱ्याचा ढीग, पाण्याची व्यवस्था नीट नाही राजकीय खुन्नस म्हणून आपण अपूर्ण केलेले रस्ते असे कितीतरी अपयश आपल्या माथी मारून घेतल्या नंतर ही एक श्रेय लाटण्याची नामुष्की तुम्ही पुन्हा लावून घेतली, ना तुमच्याकडे काही निधी येतो ना तुम्ही काही बजेट लावू शकता मग हे काम तुमचे कशावरून लहान मुलांना समजेल अशी तर ही गोष्ट आहे
पुराव्यासकट पोस्ट करत आहे की हे काम आमदार चेतन विठ्ठल तुपे साहेब यांच्या निधीतून झालेल असून महाविकास आघाडीच्या सर्व नेते पदाधिकारी यांच्या समक्ष नारळ फोडून सुरू केलेल आहे कृपया महाविकास आघाडीच्या कामाचं श्रेय तुमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी करू नये.
असा मजकूर या पोस्ट मध्ये टाकण्यात आला आहे.


या पोस्ट संदर्भात माजी आमदार योगेश टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता,
येथील ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुणे महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवकांच्या निधीतून झालेले आहे तसेच रस्त्याच्या कामा संदर्भात लागलेला फ्लेक्स हा दुसरा रस्त्याचा आहे आमदारांनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे त्यांनी केलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचे काम आम्ही करत नाही पत्रकार परिषद घेऊन आमदारांनी कामांचा पाढा वाचला मात्र मी आमदार असताना विशेष निधी 5 कोटी रुपये मंजूर करून आणला होता त्याच कामांचे नारळ फोडण्याचे काम आमदार करत आहे तसेच मी मंजूर केलेले काम लोकांसमोर मांडत आहेत गेल्या दीड वर्षात त्यांनी एकही प्रकल्प किंवा काम मंजूर करून आणले नाही त्यांनी केलेलं काम जनतेसमोर मांडावे मी केलेल्या कामाचे श्रेय त्यांनी घेत फिरू नये मी केलेल्या मंजूर केलेल्या कामाच्या ठिकाणी बॅनरबाजी केलेले नाही मात्र आमदार माझ्या कामाचे श्रेय लाटत असताना मी त्याकडे लक्ष देत नाही कारण मी संकुचित राजकारण करणारा नाही, अशा शब्दात माजी आमदार टिळेकर यांनी टिका केली.

नाकारलेल्या माजी आमदारावर प्रतिक्रिया नकोच ….
हडपसर च्या सुज्ञ जनतेने त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करून घरी बसविले आहे, त्यांनी निधी आणला तर कामे का केली नाहीत, आम्ही पाठपुरावा करून विकासकामे करत आहोत, हे त्यांना बघवत नाही, बॅनर बाजी करतात त्यांच्याविषयी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही मतदारांनी नाकारल्याने काही काम राहिलेले नाही
आ.चेतन तुपे
आमदार – हडपसर विधानसभा

महापालिका निवडणूक जुगलबंदी सुरू
काही महिन्यांवर पुणे महापालिका निवडणूक येऊन ठेपली आहे, पालिकेत भाजपची सत्ता आहे तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनेक नागरसेवक निवडून आलेले आहेत, आमदारकीच्या निवडणुकीत आलेले अपयश पुसण्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी माजी आमदार योगेश टिळेकर व्यूहरचना करत आहेत, तर भाजपला रोखत पालिकेत सत्ता आणण्याच्या दृष्टीने विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्त निवडून आणण्याचा चंग बांधला आहे, राज्यात महाविकासाघाडीची सत्ता असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत कोण कोणाला धोबीपछाड देतंय हा चर्चेचा विषय आहे त्यातच कामांचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असल्याने निवडणुकपूर्व “जुगलबंदी” रंगली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x