पुणे : – मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील एका कर्मचाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला असून, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला आहे. त्याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.
याप्रकरणी संदीप बळीराम वाघमारे (रा. वरळी) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बळीराम हे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात पोलीस शिपाई आहेत. मुख्यालयात त्यांची नेमणूक आहे. दरम्यान, यातील पीडित तरुणी ही नात्यातील आहे. त्यामुळे त्यांची ओळख होती. यावेळी संदीप याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच अत्याचार केले. तर यानंतर लग्न झाल्याचे भासवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यासोबतच फिर्यादी यांच्या आई वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख व अडीच तोळे सोने घेऊन ते परत न करता फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस (Lonikalbhor Police) करत आहे.