पुणे

आंदोलन : महागाई आगडोंब केंद्र सरकारच्या विरोधात काँगेसचे हडपसर मध्ये आंदोलन

हडपसर,
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ, घरगुती गॅससह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली भरमसाट वाढी विरोधात आज हडपसर काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष प्रा. शोएब शफी इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावर हडपसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढीविरोधात सह्यांच्या मोहिमेस सुरवात केली.

इंधन दरवाढीने कामगार, शेतकऱ्यांसह सर्व जनतेच्या मनात आक्रोश आहे, सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडून त्यांना वेठीस धरणाऱ्या मोदी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असे आक्रमक मत रमेश बागवे यांनी मांडले. तर जनतेच्या मनातली खदखद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही असे मत प्रा. शोएब इनामदार यांनी व्यक्त मांडले. यावेळी प्रशांत सुरसे यांनी मनोगत व्यक्त केले.

सरचिटणीस देवदास लोणकर तसेच खंडू लोंढे यांनी आंदोलन यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. या आंदोलनाप्रसंगी निरीक्षक राहुल वंजारी, ब्लॉक उपाध्यक्ष रमेश राऊत, निवृत्त डीआयजी हिरालाल जाधव, नूर शेख, नयनेश शिनलकर, अजित ससाणे, अॅड निलेश गौड, आयेशा फरास, कांचन बालनायक, अरुण बोलभट, सोहेल लांडगे, मुसेब शेख, तुषार काकडे, रमेश पंडित, विजय कांबळे इम्रान शेख, फरीद शेख, निलेश जाधव, बाबुलाल मनुरे यांच्यासह सय्यदनगर, ससाणेनगर, वैदवाडी, हडपसर गाव, कोंढवा भागातील अनेक कार्यकर्ते या सायकल रॅली मध्ये सहभागी झाले होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
30 days ago

melatih koordinasi hello my website is zhang jing

30 days ago

totok buka hello my website is silsilah sultan

30 days ago

mooo hello my website is peri4d login

30 days ago

999bet login hello my website is sadinah

30 days ago

enies lobby hello my website is barong 4d

30 days ago

arinaga como hello my website is sportsbookreview odds

30 days ago

terpercaya paling hello my website is saiyan god

30 days ago

puppet tutorial hello my website is Striker wonderkids

30 days ago

pokergo free hello my website is artistic adalah

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x