पुणे

“शिवसेनेकडून नव्याने समाविष्ट “या” गावांची जबाबदारी नगरसेवक नाना भानगिरे यांच्याकडे”

हडपसर – नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या देवाची उरुळी , हांडेवाडी, औताडेवाडी-
होळकरवाडी व मांजरी बुद्रुक या गावांच्या समन्वयाची जबाबदारी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्यावर नगरसेवक म्हणून सुपूर्द करण्यात आली आहे.

जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांनी तसे पत्र नगरसेवक नाना भानगिरे यांना दिले आहे.
यावेळी उपशहर प्रमुख समीरआण्णा तुपे उपस्थित होते. नव्याने समाविष्ट गावांच्या
महानगरपालिकेत समावेश झाल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होत आहे .तसेच दैनंदिन कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काचीही आवश्यकता आहे.त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या गावांच्या समन्वयाची जबाबदारी भानगिरे यांच्यावर दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते खासदार संजय राऊत ,शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर,माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील संपर्क प्रमुख बाळाभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रमोदनाना वसंत भानगिरे यांना देवाची उरुळी , हांडेवाडी, औताडेवाडी-
होळकरवाडी व मांजरी बुद्रुक या नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट
झालेल्या गावांची प्रभारी नगरसेवक म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली
तरी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी भागात आपल्या प्रभागाप्रमाणे लक्ष द्यावे, असा स्वरूपाचे पत्र जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांनी दिले आहे.

या गावातील नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या जाणून घेतल्या जातील. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येतील. नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून शिवसेनेने पुढाकार घेतला असून, या गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, गावांसाठी समन्वयाची पक्षाने आपल्यावर दिलेली जबाबदारी ही आधिकाधीक नागरिकांच्या अडचणी सोडवून पार पाडली जाईल.
प्रमोदनाना भानगिरे
नगरसेवक पुणे मनपा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x