पुणे

“आपल्या साहित्य लेखणीतून समाजाला योग्य दिशेकडे नेणारे” – संजय अण्णा सातव

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला वैचारिक शिक्षित करण्याचे काम केले, समाजात आधुनिक चळवळ सुरू केली लेखणीतून क्रांती घडविली व सर्व स्तरातील वंचितांना दिशा देण्याचे काम केले असे प्रतिपादन भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संजय सातव यांनी केले.
साहित्यरत्न, उत्कृष्ट कवी, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील अग्रगण्य व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती संजय आण्णा सातव जनसंपर्क कार्यालय येथे साजरी करण्यात आली.

यावेळी हांडेवाडीचे उपसरपंच पै.अशोकभाऊ न्हावले, हनुमंत घुले पाटील, राणीताई फरांडे, दिपक भोसले, सुफियान खान, विश्वास पोळ, अशोक मखरे, रेवान जाधव, सुभाष फरांडे,राजेश कांबळे, माऊली साळुंके, तालिफ अन्सारी, रोहिदास लगड, दासु दुनगव, अनिल तिवारी, सहदेव शिंदे, संदिप नलावडे, संजय भुजबळ, बाप्पु मिरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.