पुणे

10 लाखाचा चरस विक्रीस आणलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या ; पुणे गुन्हे शाखा व अमली विरोधी पथकाची संयुक्त कारवाई

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन)
पुण्यामध्ये चरस विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपीस गुन्हे शाखा व अंमली विरोधी पथकाने ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या आहेत, लांबले पोलीस पथकाने दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांसोबत खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ तपास अनुषंगाने माहिती काढण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते, यावेळी एलफिस्टन रोड, एस एम जोशी हॉस्पिटल समोरील फडके बाजार बस स्टँड समोर, सार्वजनिक रोडवर विकास बब्बरसिंग इटकान, वय 22 वर्षे राहणार वार्ड नंबर 10, भारत नगर, हिस्सार, हरियाणा याचा संशय आला, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी प बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये दहा लाख दहा हजार 500 रुपयांचा चरस व मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला, एक किलो चरस आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
खडकी पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे पुढील तपास करत आहेत.
ही कामगिरी अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा एक पुणे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अमलदार सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.