पुणे

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सदभावना दिवस साजरा

हडपसर पुणे : 
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दिवस साजरा करण्यात आला. भारतात विविधतेत एकतेची भावना दृढ व्हावी. राज्यातील विविध प्रदेशात अनेक धर्माच्या अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये ऐक्याची भावना वाढावी. यासाठी सदभावना शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय जगताप उपप्राचार्य, डॉ.संजय जडे, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ.अतुल चौरे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.