पुणे

हेच ते पुणे पोलीस मुख्यालय आणि इथेच संजय राठोडचं प्रकरण झालं. आजपर्यंत गुन्हा दाखल नाही.” – चित्रा वाघ

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वानवडी बलात्कार प्रकरण संदर्भात माहिती घेतली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केला असून पुणे पोलिसांचे चित्रा वाघ यांनी कौतुक केलं. तर पूजा चव्हाण प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. “मान शरमेने खाली जाईल अशी घटना आहे. परवा कळलं ८ माणसं आहेत. सकाळी कळतंय जवळपास १३ ते १४ लोकं आहेत. पुणे पोलिसांचं कौतुक आहे, की त्यांनी अतिशय चांगली कामगिरी करत १४ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विकृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १४ आरोपींपैकी १२ जण विवाहित आहे. त्यांना हा प्रकार करताना काहीच कसं वाटलं नाही.” असं भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितलं.”हेच ते पुणे पोलीस मुख्यालय आणि इथेच संजय राठोडचं प्रकरण झालं. आजपर्यंत गुन्हा दाखल नाही.”, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

बीडमध्ये सध्या गुंडाराज चालू आहे पोलिसांनी जी कारवाई केली ती कोणत्या आधारे गेली याची माहिती पोलिसांनी देणे गरजेचे आहे. सत्तेचा गैरवापर करुणा शर्मा बाबतीत झाला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. दुसरीकडे पूजा तडस प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. “पूजा तडस तिच्याबरोबर माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे. पूजाचा संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तडस यांचा हा घरगुती वाद आहे तो समोर आला कसा यात कुठलेही राजकारण केलं जातं नाही.” असंही त्यांनी सांगितलं.

सरपंच गौरी गायकवाड मारहाणप्रकरणी पत्रकारांनी चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर आपलं मत व्यक्त केलं. “पुण्यातील कदमवाकवस्ती या ठिकाणी सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली त्याबाबत वेगवेगळे खुलासे सध्या केले जात आहेत पूर्ण सीसीटीव्ही देऊन या प्रकरणाची चौकशी करावी. जर एखादा पुरुष महिलेला मारहाण करत असेल, तर महिला गप्प बसणार नाही. कदमवाकवस्ती या ठिकाणचं लसीकरण केंद्र का बंद केलं गेलं याचे उत्तर अजित दादांनी द्यावे. मला अजित पवार यांची काम करण्याची पद्धत पूर्णतः मला माहित आहे. त्यामुळे दादांनी या प्रकरणात लक्ष घालावे.”, असं त्यांनी पुढे सांगितलं.