पुणे

काळे बोराटेनगर येथे मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

विधानसभेचे लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नगरसेवक योगेशबापू ससाणे यांच्या प्रयत्नातून आज ही मोहीम राबविण्यात आली आहे.
या मोहिमेचे आयोजन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा हडपसर विधानसभेचे सरचिटणीस विठ्ठल विचारे पाटील व एकता फाऊंडेशन अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी निर्मलाताई विचारे पाटील यांनी केले होते.
यावेळी लस घेणारे नागरीकांसाठी चहा व बिस्कीट देण्यात आले.
या भागातील नागरिकांनी लसीकरणास उत्तम प्रतिसाद देऊन आपला हडपसर मतदारसंघ कोरोनामुक्त करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप,महापौर राजलक्ष्मी ताई भोसले,नगरसेवक योगेश बाप्पू ससाणे,हडपसर विधानसभा अध्यक्ष डाॅ शंतनु जगदाळे,उपाध्यक्षा शितलताई शिंदे, स्वीकृत सदस्य संजय शिंदे,सागरराजे भोसले,बाळासाहेब न्हावले,प्रभाग अध्यक्ष हरिषजी नवले,हनुमान सेवा ट्रस्टचे दत्ता चौधरी, आण्णा भालेकर, शिवदास पवार ,बापू बोराटे,गजानन महाराज सेवा ट्रस्टचे धर्मेंद्र इंगळे,गुप्ते ताई, विठ्ठल खुटवड,शौकत शेख,सुरज बाबर,यश सुपेकर,ओंकार साळुंखे,सुजित जाधव,गणेश भोंगळे,सौरभ उरसळ,मनिष जगताप व परिसरातील नागरीक उपस्थित होते.