पुणे

रामदास वाघू जगदाळे यांचे रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड

हडपसर (Rokhthok Maharashtra News Online )

रामदास वाघू जगदाळे यांचे रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी संस्थेमध्ये आजीव सभासद मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य या पदावर काम केलेले आहे, संस्थेमध्ये तीस वर्ष सेवा करून प्राचार्य पदावरून ते निवृत्त झालेले आहेत, यापूर्वीही त्यांना पुरंदर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार ,पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे, 2010 मध्ये ते सेवानिवृत्त झालेले आहेत.