पुणे

“खून करून पसार झालेला आरोपी तीन तासांत जेरबंद बारामती पोलीसांची दमदार कारवाई”

लोणी काळभोर (स्वप्नील अप्पा कदम)
बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने दमदार कामगिरी केली आहे,स्वतःच्या मुलाचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या तीन तासात मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
पोलीस निरीक्षक  महेश ढवान यांना पारवडी गावचे पोलीस पाटील यांनी फोन द्वारे कळविले की पारवडी गावच्या हद्दीत चिटकुले वस्ती येथे कातकरी समाजाच्या एका इसमाने स्वतःच्या मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करून खून केला आहे, सदरची बातमी मिळताच पोलीस निरीक्षक ढवाण हे पोलीस घेऊन घटनास्थळावर रवाना झाले त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी मारुती साधुराम जाधव हा कातकरी समाजाचा माणूस मजुरीसाठी पारवडी गावच्या हद्दीत आला असून त्याचे सावत्र मुलाचा गोपीनाथ मारुती जाधव याच्याशी घरगुती कारणावरून भांडण झाले होते, भांडणाच्या रागात मारुती जाधव यांनी स्वतःच्या मुलास लोखंडी कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करून खून करून पसार झाला.
फरार आरोपीस अटक करण्यासाठी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या, परंतु आरोपीस अटक करणे पोलिसांसाठी खूप कठीण काम होते कारण हा आरोपी हा आदिवासी समाजाचा असल्यामुळे तो मोबाईल वापर करीत नव्हता तसेच त्याचे कोणी नातेवाईक नसल्याने, आरोपीची कोणतीही ओळख, फोटो उपलब्ध नसल्याने आरोपी अटक करणे जिकिरीचे काम होते.
गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या सूचनेप्रमाणे घटनास्थळापासून वनविभागाचा 10 ते 15 किलोमीटरचा टप्पा पायी सर्च करून वनविभागातील झाडीत लपलेल्या आरोपीस अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले पुढील कारवाई पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी केले.